कोपरगाव पुरोहित व ब्राह्मण सभेकडून आ. मिटकरींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

कोपरगाव पुरोहित व ब्राह्मण सभेकडून आ. मिटकरींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

From Kopargaon Purohit and Brahmin Sabha. Strong protest against Mitkari’s statement

माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करूApologize, otherwise we will agitate

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 21 Apr 2022, 18 :00Pm.

कोपरगांव : राष्ट्रवादी काँगसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे ब्राम्हण समाज व पुरोहितांचा अपमान होईल असे अपशब्द जाहिर सभेत व्यक्त केला त्याचा कोपरगांव येथील पुरोहित व ब्राम्हण सभेतर्फे तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

मुक मोर्चाने तहसिल कार्यालयावर येऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले व मिटकरी यांनी समाजाची माफी न मागितल्यांस तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला.

ब्राम्हण ही संस्कृती आहे ब्राम्हण हा संस्कार आहे. ज्या जातीत संस्कार व संस्कृती दडलेली आहे. त्या समाजाचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही आमचा समाज सुसंस्कृत असून तो मिटकरींसारखा विकृत मनाचा नाही. ब्राम्हण समाजाने कायम समाजाला संस्कारीत करण्याचेच काम केले आहे कधीही चुकीचे वर्तन केले नाही. व पुरोहितांनी कधीही कन्यादान ऐवजी भार्यादान असा शब्द उच्चारला नाही जे शास्त्रात नाही ते शब्द मिटकरींनी उच्चारुन आपल्या विकृत मनाचे प्रदर्शन केले आहे.

ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. संस्कार काय असतात हे आमच्याकडून शिका. जाहिर सभेत ब्राम्हण समाजाची टिंगलटवाळी केली जात असतांना पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आव्हाड आदि त्याचा मनमुराद आनंद घेतांना दिसले. वास्तविक अशी वक्तव्ये केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. मिटकरींसह जयंती पाटील, मुंडे,आव्हाड यांचा आम्ही तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याच्या भावना ब्राम्हण समाज महिला अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा जवाद,वृंदा कोर्‍हाळकर, पुरोहित वैभव जोशी, जयेश बडवे, यांच्यासह माजी नगराध्यक्ष ऐश्‍वर्या सातभाई यांनी कवितेच्या माध्यमातून मिटकरी यांचा निषेध केला .

यावेळी मिटकरी यांचेवर कायदेशीर कारवाई न केल्यांस व मिटकरी यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यांस आम्ही तिव्र आंदोलन करु व १ मे पासून साखळी उपोषण करु असा ईशारा देण्यात आला.

या निवेदनावर अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर, सचिन महाजन,संजीव देशपांडे,विक्रमादित्य सातभाई,मकरंद जोशी,महेंद्र कुलकर्णी, वसंत ठोंबरे,गोविंद जवाद, तुषार विद्वांस, बाळकृष्ण कुलकर्णी, संदीप देशपांडे,योगेश कुलकर्णी, गौरीष लव्हुरीकर,इंजि.प्रसाद नाईक, डॉ.मिलिदं धारणगांवकर, अजिंक्य पदे,मुकूंद कालकुंद्री, सौ.सायली कुलकर्णी, वर्षा वाडेकर, सुलभा देशपांडे,नेत्रा कुलकर्णी, आरती जोशी,निर्मला कुलकर्णी, स्वाती मुळे, बारबिंड, आदिंच्या सहया आहेत. यावेळी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page