कंटेनरची आणि ॲपे रिक्षाला धडक, ७ जण जागीच ठार,६ जखमी 

कंटेनरची आणि ॲपे रिक्षाला धडक, ७ जण जागीच ठार,६ जखमी 

7 killed, 6 injured in container and Ape rickshaw collision

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Fir 6 May 2022,13.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव ते झगडे फाटा मार्गावर  मोटरसायकल वरील प्रवाशांना वाचविण्याच्या नादात कंटेनर आणि ॲपे रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन  विद्यार्थिनीसह ७ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी आठ साडे आठ वाजता झालेल्या या भीषण अपघातात  ॲपे रिक्षा चा  चेंदामेंदा झाला.

कोपरगाव कडून झगडे फाट्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने डाऊच खुर्द  परिसरात पगारे वस्ती नजीक समोरून येत असलेल्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, रिक्षात बसलेले प्रवाशांच्या जवळ असलेले सामान विद्यार्थिनीची दप्तर सर्वत्र विखुरले होते, घटनास्थळी मासांचा व रक्ताचा सडा पडला होता, या रिक्षात एकूण बारा जण बसले होते.  अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, तीन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील तीन जण तर मोटार सायकल वरील तीन जण असे एकूण सहा जणगंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतांची नावे:  राजाबाई साहेबराव खरात (६०) रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव, आत्माराम जमानसा नाकोडे(६५) रा. वावी तालुका सिन्नर, पूजा नानासाहेब गायकवाड (२०)  रा. हिंगणवेढे, प्रगती मधुकर होन (२०)  रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव, शैला शिवाजी खरात (४२) शिवाजी मारुती खरात (५२) दोघेहि रा. श्रीरामपूर, रूपाली सागर राठोड (४०) अशी मयताची नावे आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की झगडेफाट्यावरून ॲपे रिक्षा क्रमांक एम एच १७ ए जी ९०५६ ही प्रवाशी घेऊन कोपरगावकडे जात असताना पगारे वस्ती जवळ औरंगाबाद हुन कोपरगावहुन मुंबईकडे जात असलेला लोखंडी गज घेऊन चाललेल्या कंटेनरने क्रमांक ०५ पी बी ४००६ जोरात धडक दिली. भरधाव असलेला कंटेनर मोटरसायकल क्रमांक एम एच १७ सी डी २०८३  वरील तिघांना वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे समजते, कंटेनर चालक अपघात करून पळून जात असताना त्याला झगडे फाट्यानजीक नागरिकांनी पकडले, चालक दर्शन सिंग गजन सिंग (४१) असे त्याचे नाव असून केस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमींमध्ये  ध्रुव सागर राठोड (१५) पंधरा, कृष्णाबाई गोविंद चौधरी (४२) ,सर्वेश दिगंबर चौधरी(१२), विलास साहेबराव खरात (३०) कावेरी विलास खरात राहणार झगडे फाटा  (५)अशी जखमींची नावे आहेत, जखमींना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली. सर्व मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले होते ,नातेवाईकांनी येथे मोठी गर्दी केली एकच आक्रोश केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page