कोपरगांवची शिवसेना पाहिली की, बाळासाहेबांच्या लालबाग सेनेची आठवण होते- आ. सुनील शिंदे
Shiv Sena of Kopargaon saw that Balasaheb’s Lalbagh Sena was remembered. Sunil Shinde
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 30 May 2022, 16.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : “कोपरगांवची शिवसेना पाहिली की बाळासाहेबांच्या लालबाग सेनेची आठवण होते. असे गौरवोद्गार शिवसंपर्क अभियान प्रमुख आ. सुनील शिंदे यांनी कोपरगाव येथे कलश मंगल कार्यालयात घेतलेल्या शहर व ग्रामीण शिवसंपर्क अभियान टप्पा दोन च्या कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे होते.
शिवसेना पक्षाने आजपर्यंत सामान्य शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले.निष्टावंत शिवसैनिकांना शिवसेनेने मोठे केले. गुलाबराव पाटील, बबनराव घोलप, चंद्रकांत खैरे त्याचप्रमाणे मी स्वतः सुद्धा याचेउदाहरण आहे. असे अनेक शिवसैनिक मोठे झाले. हे फक्त शिवसेनेतच होवू शकते. पक्षात निष्ठेने काम करणा-यांना मोठे भविष्य आहे.
शिवसेनेने, सरकारने केलेले काम शिवसैनिकांनी तळमळीने जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोकांना व्हावा, यासाठी तळागाळात पोहोचले पाहिजे. त्यामुळे काम करा आणि रिझल्ट द्या,’ असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, मी कोपरगांवचा जिल्हाप्रमुख नसुनही कोपरगांव शिवसेनेचे विशेष प्रेम माझ्यावर आहे. पक्षप्रमुखांच्या स्वप्नपुर्तीसाठी सर्वांनी चांगले काम करावे असे आवाहन केले.
उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी शिवसंपर्क अभियान ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना शिवसेनेत क्रांती करणारी असुन, मुख्यमंत्र्यांची कामे आणि शिवसेना पक्षाचा विचार घराघरात पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी सेवक म्हणून काम करावे. हेच पक्षाला अपेक्षीत आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठा निधी कोपरगांवसाठी दिला.खा.लोखंडे यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्याला मदत झाली. फक्त भाजप च नाही तर दोन्ही कॉंग्रेसही राजकीय स्पर्धक असल्याने स्वतंत्ररित्त्या संघटना वाढवण्याचे आवाहन केले.
तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी गटबाजी करुन पक्षाला अडचणी आणणा-यांचा समाचार घेत त्यासाठी पक्षाने ताकद द्यावी त्यामुळे कोपरगांवात शिवसेनेचा पुन्हा आमदार होईल असा विश्वास व्यक्त केला.
भरत मोरे यांनी कोपरगांव शहराला स्मशानभुमी साठी कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगीतले. मनोज कपोते, प्रवीण शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब जाधव, संजय सातभाई, सपना मोरे, मनोज कपोते, रावसाहेब थोरात, माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, सनी वाघ, अनिल आव्हाड, योगेश बागुल, अतुल काले, सरपंच सतिश कानडे, उषाताई दुशींग, रंगनाथ गव्हाणे, बाबासाहेब बढे, राजेंद्र नाजगड, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब मापारी, अशोक कानडे, राहूल होन, अनिल नळे, रविंद्र वाघ, चंद्रकांत भिंगारे, सचिन आसणे, सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, संजय दंडवते, रविंद्रनाना कथले, गणेश जाधव, योगेश मोरे, मयुर खरनार, गगन हाडा, बालाजी गोर्डे, भुषण पाटणकर, मुन्ना मन्सुरी, सागर जाधव, सागर फडे, विक्रम सातभाई, अमोल शेलार, आकाश कानडे, राजेंद्र शिलेदार, नवनाथ औताडे, धर्मा जावळे, शिवाजी रोहमारे, विजय गोर्डे, राखी विसपुते, सारीका कु-हे, नेहा कोकणे, विजय ताजणे, रविंद्र जेजूरकर, रविंद्र शेळके, बाबासाहेब चौधरी, मच्छिंद्र नवले, आदीसह नगरसेवक शिवसेना युवासेना महिला सेना महिला आघाडी पदाधिकारी व् शिवसैनिक व कोरोना काळात सेवा देणाऱ्या सत्कार मूर्ती अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने हजर होत्या . सुत्रसंचलन रावसाहेब थोरात व आभार असलम शेख यांनी मानले.