तर आज लोटांगण घालण्याची पाळी आलीच नसती – रविंद्र पाठक

तर आज लोटांगण घालण्याची पाळी आलीच नसती – रविंद्र पाठक

Today it would not have been the turn to prostrate – Ravindra Pathak

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 20.20
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाचा विकास व शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर आज लोटांगण घालण्याची पाळी आलीच नसती अशी बोचरी टीका भाजपाचे माजी पालिका गटनेते रविंद्र पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ना. आशुतोष काळे यांच्यावर नाव न घेता केली.

ना. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहराचा पाणी प्रश्न व तालुक्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणून गाजावाजा करण्याशिवाय काहीही केलेले नाही. शहराचा पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. प्रामाणिक प्रयत्न केले असते तर अडीच वर्षात हा प्रश्न सुटला असता परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना रखडविण्याचे पापच केले आहे आजही तालुक्यातील व शहरातील जनतेला पाणी, रस्ते, सिंचन, आरोग्य व इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. असे असताना शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला, असा चुकीचा प्रचार करत आहेत. असा आरोप पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पाच नंबर साठवण तलावासाठी व निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त व पाणीपुरवठा योजनेस सेना भाजपा रिपाई युतीच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी दिल्याने ही योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठविता आली. पालिकेत काळेगट अल्पमतात होता. तेव्हा आज ही योजना मंजूर झाली हे काही आ. काळे यांचे एकट्याचे श्रेय नाही, परंतु फुकटचे श्रेय घेण्यासाठी आपणच मंजूर करून आणली, असे सांगत आहांत. साठवण तलाव आणि निळवंडे पाणी योजना कोणत्याही राजकारणाशिवाय आम्ही पाठपुरावा करून पूर्ण करणारच. अशी ठाम ग्वाही पाठक यांनी पत्रकातून दिली आहे. कोपरगाव बसस्थानक, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, नगरपालिका वाचनालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे व भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील आहेत मात्र श्रेय तुम्ही घेतले अशी टीका पाठक यांनी शेवटी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page