बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वपुर्ण – पोनि. दौलतराव जाधव
Development of democracy in childhood is important for girls – Poni. Daulatrao Jadhav
संजीवनी अकॅडमीत विद्यार्थी समितीची निवडSelection of Sanjeevani Academy Student Committee
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांवः संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी लोकशाही पध्दतीचा अवलंब करीत ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी समिती निवडून बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वाची असते, या विचार धारेला महत्व दिले, असे प्रतिपादन कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर दौलतराव जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे होत्या.
संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शालेय कामकाज चालविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने २६ विद्यार्थ्यांचे जम्बो विद्यार्थी परिषद मंडळ निवडण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपुर्वक आमंत्रित करून त्यांना प्राचार्या सौ. शैला झुंजारराव यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, संजीवनी अकॅडमीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर सौ. सुधा सुब्रमण्यम, उपस्थित होते. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन सेजल संतोष ढाकणेे हीची निवड झाली तर उपप्रतिनिधी पदावर स्वरा स्वप्नील गवारे हीची निवड झाली. सांस्कृतिक विभाग सांभाळण्यासाठी सिध्दी दत्तात्रय घाडगे व परीमल दत्तात्रय आदिक, क्रीडा विभागाचे कामगाज सांभाळण्यासाठी सिध्दी प्रविण बोठे व संध्या सचिन सिनगर, संपुर्ण शैक्षणिक वर्षात शिस्तीचे पालन करून घेण्यासाठी आर्य योेगेश भैरवकर, निलमबारी अमरीश मेमाणे, आदित्य धर्मराज भामरे व श्रृती रूपेश पारख यांची निवड झाली. विध्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्या गटांमार्फत विविध ऊपक्रम राबविवण्यात येतात. या गटांना इंद्रधनुष्याच्या रंगांचे नावे देण्यात आली आहेत. या गटांसाठीही कॅप्टन व व्हाईस कॅप्टनच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
श्री जाधव यांनी पुढे म्हटले की, या विध्यार्थ्यांमध्ये प्रतिभा संपन्नता आहेच. आता त्यांच्याकडे नेतृत्व येवुन त्यांच्या हातुन भविष्यात ते मोठे झाल्यावर दातृत्वही अंगिकारले जाईल. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे यश म्हणजे माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी सर्वगुण संपन्न पिढीचे पाहीलेल्या स्वप्नांना, संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डाॅ. सौ. कोल्हे यांचे मार्फत मिळत असलेल्या बळकटीचे प्रतिबिंब आहे.
निवडणुक अधिकारी म्हणुन राहुल सुर्यवंशी व सुजय काळपेकर यांनी काम पाहीले.





