कोपरगाव : कंटेनरची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार,

कोपरगाव : कंटेनरची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार,

Kopargaon: Container collides with bike; One person was killed on the spot.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .4 Oct , 19.20 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार  झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली. पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावरील पवार वस्तीजवळ मंगळवारी ४ ऑक्टोबरला  हा दु्र्दैवी अपघात झाला.

सुनील बाबुराव साळवे (४७) राहणार कोपरगाव तालुक्यातील सावळगाव असे मृताचे नाव आहे.  त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १७  सीटी ६५९४ ने त्यांचा प्रवास सुरू होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास  जात असताना, पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावरील पवार वस्तीजवळ  पुणतांबा फाट्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या येणाऱ्या कंटेनरने ( एच.चार ३८ ए.ए.  ७७९७) दुचाकीला जबर धडक दिली.
कंटेनरसारख्या मोठ्या वाहनाने दुचाकीला दिलेली ही धडक एवढी भीषण होती की मोठा अपघात घडला. दुचाकीवर स्वार सुनील साळवे  यांचा जागीच मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव दिसले व त्यांचे सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तसेच, मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ज्या कंटेनरने अपघात झाला तो कंटेनर व चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page