बारा ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच निवडीत काळे गटाचे आठ उपसरपंच बिनविरोध 

बारा ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच निवडीत काळे गटाचे आठ उपसरपंच बिनविरोध 

Eight upasarpanchs of the Kale group unopposed in the upasarpanch elections of twelve gram panchayats

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 Dec22 , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील गुरुवारी झालेल्या १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत काळे गटाचे आठ उपसरपंच बिनविरोध निवडून आले असून यापूर्वी निवडणुकीत जनतेतून काळे गटाचे १६  सरपंच निवडून आले आहेत

यामध्ये माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, भोजडे, सडे, रांजणगाव देशमुख, वडगाव, मोर्विस, शहापूर, शिंगणापूर, वेस-सोयगाव, पढेगाव, खिर्डी गणेश या गावांच्या उपसरपंच पदाची निवडणूक नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

 काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच  माहेगाव देशमुख-भास्करराव किसनराव काळे, कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे, भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर, सडे-अनिल गणपत बारहाते, रांजणगाव देशमुख- त्रिंबक रामभाऊ वर्पे, वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे, मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे हे ८ उपसरपंच आ. आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत.

या सर्व उपसरपंचांचे माजी आमदार अशोकराव काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

उपसरपंचपदाची संधी दिली त्या संधीचे सोने करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवू अशा प्रतिक्रिया सर्व उपसरपंचांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केल्या.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page