सौ. रेणुका कोल्हे यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान
Mrs. Renuka Kolhe was awarded the Jnyanjyoti Award
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 10 March23 ,20.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव: शिक्षण, सहकार व सामाजिक कार्यातील योगदानाबददल संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांना शिर्डी प्रेस क्लबचा ज्ञानज्योती पुरस्कार भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनी विखे यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आला.
सौ. रेणुका कोल्हे यांनी हा पुरस्कार बचतगट महिला व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अर्पण केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. महिला बचतगट चळवळीनै ग्रामिण भागातील महिलांना हक्काचे व्यासपिठ निर्माण झाले आहे. या सावित्रीच्या लेकींचा आपल्या हातुन जो सन्मान झाला तो कौतुकास्पद आहे.
सौ. रेणुका विवेक कोल्हे म्हणाल्या की, सामाजिक कार्यातुन सासर आणि माहेर या नांवलौकीक वाढविण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शनाखाली महिला बचतगट चळवळीतुन सामाजिक कार्यात सहभागी होता आले., ग्रामिण भागातील मुला मुलींचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानज्योती पुरस्कार हा सन्मान आपला नसुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका सुवर्णा सोनवणे, हर्षा कांबळे, दिपा गिरमे, विद्या सोनवणे, विजया देवकर, शिल्पा रोहमारे आदि महिला उपस्थित होत्या. या पुरस्काराबद्दल सौ रेणुका कोल्हे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.





