कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम

On the occasion of the 102nd birth anniversary of Karmaveer Shankarao Kale, ‘Maharashtra’s Laughter Kallol’ program

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 23 March24 ,16.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव – माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे  यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” हा आगळा वेगळा आयोजित करण्यात आला आहे.

सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर कोपरगाव तालुक्यातील रसिकांना मनमुराद हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे कलाकार येत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे /संबेराव, वनिता खरात, रोहित माने यांच्या समवेत सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे, रील स्टार नृत्यांगना माधुरी पवार आदी दिग्गज कलाकार आहेत.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्देश्वर झाडबूके, चैताली जाधव करणार आहे.

  विनोद क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना भेटण्याची व पोट धरून हसण्याची संधी न दवडता या “महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” या कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

      

Leave a Reply

You cannot copy content of this page