मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तीन रस्त्यांसाठी १७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आ. काळे
Tenders of 17 crores released for three roads from Chief Minister and Prime Minister Gram Sadak Yojana – A.Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 May23 ,18.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव मतदार संघात संघातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्याने लवकरच कामात सुरुवात होईल अशी माहिती आमदार अशितोष काळे यांनी दिली आहे हे आपण केलेल्या पाठपुराव्याचे फलित असल्याचे त्यांनी म्हटले आहे
यात कोपरगाव तालुक्यातील रा.मा. ३५ रांजणगाव देशमुख ते बहादरपूर या जवळपास ५ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ११ लक्ष ९० हजार, तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ५.२०कोटी व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी या रस्ता (७.८१ कोटी) या रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे
मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष बहुतांश प्रमाणात भरून निघाला आहे त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे. उर्वरित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
पुणतांबा-नपावाडी, रांजणगाव देशमुख ते बहादरपूर व पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी या प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.