संजीवनीचे १० अभियंत्याना व्हर्चुसात ५ .५ लाखांवर वार्षिक पॅकेज – अमित कोल्हे
5.5 Lakhs Annual Package of Sanjeevi to 10 Engineers in Virtus – Amit Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 9 May23 ,19.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: व्हर्चुसा या मुळच्या अमेरिकन कंपनीने संजीवनी अभियांत्रिकीच्या अंतिम संत्रातील १० नवोदित अभियंत्यांची ५ .५ लाखांच्या वार्षिक पॅकेज देवुन निवड केल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. व्हर्चुसा बरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीने संजीवनीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सही सुरू केले असुन तेथे संजीवनीचे नवोदित अभियंते आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेत आहेत. व्हर्चुसा कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये अजिंक्य दिनेश जाधव, वैष्णवी विवेक महाजन, पायल वसंत शिंदे , सुयश संजय घोलप, युवराज जालिंदर घुले, विराज अनिल रसाळ, क्रिष्णा संजय वर्मा, गौरव दादासाहेब गंदाळ, साक्षी भाऊसाहेब गाढवे व तनुजा साहेबराव निकम यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डी. बी. क्षिरसागर, डाॅ. बी. एस. आगरकर, डाॅ. डी. बी. परदेशी , डाॅ. ए. ए. बारबिंड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.
Post Views:
113