संजीवनी एमबीएच्या पाच विध्यार्थ्यांना फिंडेस्टिनेशन व एचएफएफसी कंपन्यांत  नोकरी

संजीवनी एमबीएच्या पाच विध्यार्थ्यांना फिंडेस्टिनेशन व एचएफएफसी कंपन्यांत  नोकरी

Five students of Sanjeevani MBA got jobs in Findestination and HFFC companies

                                                        सुरूवातीस साडेपाच व साडेचार लाखांचे  वार्षिक  पॅकेजAn annual package of five and a half and four and a half lakhs in the beginning

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat8 June24,16.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव: प्रत्येक पालक  आपल्या पाल्यांना नोकरी मिळावी, या खात्रीने त्यांना संजीवनी एमबीए मध्ये दाखल करातात. संजीवनी एमबीए मधून मिळालेल्या कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर  त्यांना  फिंडेस्टिनेशन कंपनीने दोन व एचएफएफसी कंपनीने तीन विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेवुन त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकरीचे पत्र दिले आहे अशी  माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

फिंडेस्टिनेशन ही पुणे येथिल ‘लोन कन्सलटंसी फर्म’ असुन माणसी नितिन कासार व आकाश  बाळासाहेब पानगव्हाणे यांची सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ५ . ५ लाखांवर निवड केली आहे तर एचएफएफसी (होम फर्स्ट फायनांस कंपनी) ही हाऊसिंगसाठी व प्रापर्टीवर आधारित कर्ज देणारी कंपनी असुन अनेक ठिकाणी या कंपनीच्या शाखा आहेत तर मुंबई येथे मुख्यालय आहे. या कंपनीने किरण संजय शिंदे, साहिल संजय मोरे व वैभव सिताराम गव्हाणे यांची वार्षिक  पॅकेज रू ४. ५  लाखांवर निवड केली आहे. विशेष  म्हणजे हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन संजीवनीमुळे आमचे पाल्ये नोकरदार झाले, अशा शब्दात पालक संजीवनीच्या व्यवस्थापन व प्राद्यापकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
हे सर्व निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या पालकांचा अलिकडेच संजीवनी एमबीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  नितिन कोल्हे, भाजपच्या प्रदेश  सचिव सौ.स्नेहलता कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर, आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
……………
विध्यार्थीनीचा प्रतिक्रिया
‘मी श्रीरामपुर येथिल रहिवासी असुन माझे वडील शेतकरी आहे तर आई गृहिणी आहे. संजीवनी एमबीए ही ऑटोनॉमस संस्था असल्याने आम्हाला एमबीए क्षेत्रातील आधुनिक ज्ञान तर मिळालेच, परंतु टी अँड पी  विभागाने आमच्याकडून मुलाखतीची खुप तयारी करून घेतली. त्यामुळे मी फिंडेस्टिनेशनच्या सर्व कसोट्या सहज पुर्ण करू शकले आणि माझी सडे पाच लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर निवड झाली. माझ्या वडीलांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास  संजीवनीने सार्थ ठरविला, आणि माझ्या बाबांचे व आईचे स्वप्न पुर्ण केले.आज आमच्या घराण्यातुन मुलगी म्हणुन मी प्रथमच बाहेर नोकरीसाठी जात आहे. खऱ्या  अर्थाने संजीवनीमार्फत महिला सक्षमीकरण होत आहे, माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या मातृतुल्य संजीवनी एमबीएला देते.’-माणसी कासार

Leave a Reply

You cannot copy content of this page