कर्मवीर भाऊराव पाटील राज्यात शैक्षणिक क्रांती आणणारे, ज्येष्ठ शिक्षण प्रसारक- सौ स्नेहलता कोल्हे

कर्मवीर भाऊराव पाटील राज्यात शैक्षणिक क्रांती आणणारे, ज्येष्ठ शिक्षण प्रसारक- सौ स्नेहलता कोल्हे

Karmaveer Bhaurao Patil Bringing educational revolution in the state, senior education broadcaster- Mrs. Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 23Sep24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक, बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, शैक्षणिकदृष्ट्य का मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणारे, स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद घेऊन राज्यात शैक्षणिक क्रांती आणणारे, ज्येष्ठ शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी  शुक्रवारी (२२) रोजी येसगाव येथील  न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जयंती कार्यक्रमात केले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीत कर्मवीरांना साजेसे कार्य केले, असेही त्या म्हणाल्या,

मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे
सौ स्नेहलता कोल्हे यांनी प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमात त्यांनी विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा   प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक  शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील  यांनी ‘शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म’ हा संदेश देऊन आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी खर्ची घालतांना  ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ 
‘कमवा व शिका’ ही योजना राबवून, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा व स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी तालुक्यासह जिल्ह्यात रयतच्या शाळांना उभारी दिली  गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी  संजीवनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेत शिकलेले विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्य करून नावलौकिक वाढवत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. असेही त्या म्हणाल्या
 चौकट 
स्वत:च्या संसाराची होळी करून दीनदलित व अठरा पगड जातींसाठी शिक्षणाची शिदोरी उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शिक्षण प्रणालीत स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या चतु:सूत्रीचा समावेश होता. ध्येयवादी, दूरदृष्टीच्या व क्रियाशील महापुरुषांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अग्रक्रमाने समावेश होतो. 
याप्रसंगी सखाराम महाराज कर्डिले, गोरख आहेर, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, शैलेंद्र पंडोरे, दगडू दरेकर, सचिन कोल्हे, शिवाजीराव कोकाटे, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब निकोले, डी. एल. शिंदे,  अतुल सुराळकर, किरण गायकवाड, दत्तात्रय आहेर,  ॲड. उत्तमराव पाईक, शंकरराव पाईक, रवींद्र कळसकर आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page