वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी एक कोटी निधी मंजूर-आ. आशुतोष काळे

वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी एक कोटी निधी मंजूर-आ. आशुतोष काळे

One crore fund approved for the development of Valumata area. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5 Feb 24, 20.00Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : कोपरगाव शहरातील वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी वळूमाता प्रक्षेत्र विकासाच्या स्वनिधीतून ०१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मतदार संघाच्या विकासासाठी मागील चार वर्षात जवळपास २९०० कोटी निधी मिळविण्यात यश आले असून मतदार संघाच्या विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या पाठ पाठपुरवा सुरु  आहे.

मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील वळूमाता प्रक्षेत्राचा विकास रखडला होता. या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या एकून पाच जनावरांच्या शेडची मोठी दुरावस्था होवून मुख्य गेट देखील तुटलेले होते. काही शेडचे पत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यात या शेडमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य राहत होते त्यामुळे पशु संवर्धन विभागाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची आ. आशुतोष काळे यांनी स्वत: पाहणी करून वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी निधी मिळावा यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. त्यातून  एक  मुख्य शेड, मिल्क शेड, भाकड शेड, मिल्क पार्लर, दवाखाना, प्रशिक्षण सभागृह, कार्यालय, निवासस्थान बांधकाम, संरक्षण भिंत सुधारणा करण्यात येणार आहेत  या एक कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच या कामाची निविदा देखील प्रसिद्ध होणार आहे. 

त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page