निमित्त वाढदिवसाचे शहरात नव्या स्थानिक राजकीय समिकरणाची नांदी?,
On the occasion of the birthday, the beginning of a new local political equation in the city?
आपापसातील राजकीय दुरावा संपणार का ?Will the political rift between them end?
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue30 April , 16.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व कॉंग्रेसचे मनोमिलन झाले आहे. काल रविवारी (दि २८) रोजी सायंकाळी सप्तशृंगी माता चौकात भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विक्रमादित्य सातभाई यांचे वाढदिवस व सप्तशृंगीमातेचा भंडारा यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व संजय सातभाई यांच्यासह भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र दिसून आल्याने विधानसभा व पालिकांच्या आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होणार असून नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे का?
गत नगरपालिका निवडणूकीत अपक्षांने नगराध्यक्ष पदाची सत्ता हस्तगत केली. हा घाव पालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या शिवसेना भाजप कोल्हे गटाच्या जिव्हारी लागला. त्यामुळे यापुढे मागचे उणे, धुणे न काढता दूरदृष्टी ठेवून किमान स्थानिक निवडणुकांमध्ये तरी सावध, अशी भूमिका स्थानिक नेत्यांना घ्यावी लागणार आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत वरिष्ठ नेते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे हे नेते सांगत असले तरी वरिष्ठ पातळी आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये फरक आहे त्यामुळे कोणासोबत आघाडी करायची आणि कोणासोबत जायचे हा सर्वस्वी निर्णय स्थानिक पातळीवरच होऊ शकेल परंतु तो घेताना त्यात संपूर्ण पारदर्शकता व प्रामाणिकपणा हवा आज लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीचे मनोमिलन झाले आहे.
पालिकेच्या गेल्या निवडणुकीतही शिवसेना-भाजप अशी आघाडी झालेली होती. लोकसभेच्या निवडणुकीत झालेले मनोमिलन असेच चालू राहिले तर येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत भाजप कोल्हे गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, आणि शरद पवार राष्ट्रवादी यांची युती होऊ शकते. लोकसभेच्या निमित्ताने झालेले मनोमिलन स्थानिक पातळीवरील आगामी पालिका निवडणुकात असे होणे शक्य असल्याने याचा सर्वाधिक फायदा चारही गटांना कोपरगाव नगर पालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. कोपरगाव नगर पालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप अशी युती होती. बहुमत सत्ता युतीलाच मिळाली होत. मात्र ऐन निवडणुकीत शिवसेनेचा एक गट तटस्थ राहिला, नगराध्यक्ष पदासाठी युतीचा भाजप कोल्हे गटाचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला होता. परिणामतः सत्ता बहुमत येऊनही नगराध्यक्ष पद अपक्षाला मिळाले
वाढलेली लोकसंख्या व प्रभाग मोठे झाल्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेसला कोपरगाव शहरात प्रत्येकी स्वबळावर फारसे यश मिळेल याची सुतराम शक्यता नाही. तरीही कोणा एका पक्षाने आता स्वत:चे बळ अजमावण्याचा निर्णय घेतला तर ती पालिका राजकारणातील पाच वर्षासाठीची राजकीय आत्महत्याच ठरेल.आजच्या प्रमाणे लोकसभेला उध्दव ठाकरे, शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत आहेत. तिकडे कोपरगाव नगरपालिकेसाठी भाजप कोल्हे गटाने सर्व विरोधक आणि इतर असंतुष्टांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कोल्हे गटातील शहरातील एक दोन माजी नगरसेवकांना आपल्या गोटात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गटाने) डिवचले आहे.
आज उध्दव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेसला एकत्र आहेत त्यांना भाजप कोल्हे गटाची साथ मिळाल्यानंतर एक नवीन राजकीय समीकरणं अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. आणी पालिकेच्या निवडणुकीतही हेच समीकरणं कायम राहण्याची शक्यता आहे.
भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विक्रमादित्य सातभाई यांचे वाढदिवस व सप्तशृंगीमातेचा भंडारा यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व संजय सातभाई यांच्यासह भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसून आल्यानेनिमित्त वाढदिवसाचे असले तरी आपापसातील राजकीय दुरावा संपणार का? आणि शहरात नव्या राजकीय समिकरणाची नांदी होणार का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे