कोपरगावात दोन  मस्तवाल वळूंची झुंज; तासभर  थरार

कोपरगावात दोन  मस्तवाल वळूंची झुंज; तासभर  थरार

Two mastwal bulls fight in Kopargaon; An hour of thrill

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat6July , 19.30 Pm.By सालकर राजेंद्र

ठळक मुद्दे

वाहनांची मोडतोड अन् वाहतुकीची कोंडी; वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरणझुंज थांबल्यानंतही शहरात मात्र,या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.

कोपरगाव  : शहरातील गांधी चौकात शनिवारी (६जुलै) रोजी दुपारी वाहनांची गर्दी हळूहळू वाढत असतानाच भर रस्त्यात दोन वळूंची झुंज सुरू झाली. अचानक घडलेल्या या प्रकाराने चौकातील सर्वांचीच पळापळ सुरू झाली. हा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दीही झाली. अनेकांनी भितीपोटी सुरक्षित ठिकाण गाठले. अखेर मस्तवाल वळूंची झुंज मिटविण्यात कोपरगावकरांना पुढाकार घ्यावा लागला. तब्बल एक तासांनतर ही झुंज थांबली. 

गांधी चौक म्हणजे कोपरगावचे हार्ट ऑफ सिटी आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणा-यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी दुपारी बारा सव्वा बाराच्या सुमारास  या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत होते. अधूनमधून ते रस्त्यावर येत असल्याने वाहतूकही विस्कळीत होत होती.काही वेळेत ते शांत होतील, असे वाटत असतानाच अर्धा-पाऊण तास झाला तरी ते थांबण्याचे नाव घेत नव्हते. काही तरुण काठीच्या साह्याने झुंज सोडविण्याचा प्रयत्न करत होते; पण प्रयत्न निष्फळ ठरले. त्यातील  एका वळूने रस्त्याकडेच्या गाड्या पाडल्या.  तरी पुन्हा त्यांच्यामध्ये झुंज लागली. जमलेल्या शेकडो जमावाने शिट्ट्या वाजविल्या, आरडाओरड केल्यानंतर ते दोन्ही वळू घाबरून पळून गेले अन् त्यानंतर ही झुंज मिटली. गांधी चौकात  घडलेल्या या प्रकाराने नागरिक भलतेचचक्रावून गेले. अनेकांनी हा थरार आपल्या कॅमेरॅत कैद केला. हीझुंज थांबल्यानंतही शहरात मात्र,या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.

बघ्यामधील फोटोग्राफर जागा

वळूंच्या झुंजीमुळे गांधी चौक  एक तास वेठीस धरला होता. जीव मुठीत धरून वाहनचालक पुढे जात होते. शेकडो  कोपरगावकर   दुकानांच्या कठड्यावर चढून सुरक्षितपणे झुंज पाहत होते. तर बोटावर मोजण्याऐवढेच तरुण झुंज सोडविण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यातूनही काही तरुणांमधील फोटोग्राफर जागा झाला. जीव धोक्यात घालून हा थरार मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी चित्रीकरण तर काहीजण फोटो काढत होते.
झुंज लागल्याने दुचाकीस्वारांनी रस्त्यावर गाड्या लावून पळून गेले. तर सायकलस्वार सायकल खांद्यावर घेऊन पळून गेले. 

पोलिसही हतबल

झुंज सुरू असल्याने मोठी वाहने रस्त्यावर थांबली होती. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली होती. त्यातच  शनिवार असल्याने   शाळा-महाविद्यालयांची सुटण्याची वेळ   असल्याने वाहनचालक ‘हॉर्न’ वाजवत होते. त्यामुळे वाहतूक पोलिस दाखल झाले; पण तेही हतबल झाले.
दोन्ही वळूची झुंजीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

   शहरात मोकार जनावरांचा प्रश्न सातत्याने गाजत असतो, या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तर एका मुलाचा व एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर मोकार जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन दिले, आंदोलन केले, मात्र अद्याप मोकट जनावरांचा प्रश्न जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. भविष्यात या मोकाट जनावरांपासून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांचा कायमचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 चौकट.                                     

  शहरात मुख्य रस्त्यावर विविध प्रभागात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत, त्यांना कोणीही वाली नाही, ज्यांची जनावरे आहेत की सर्रास मोकाट सोडून देतात, त्यामुळे ही जनावरे मस्तवाल झाली आहेत, त्यांचा तातडीने बंदोबस्त करून नगरपालिकेने कोंडवाड्यासाठी त्वरित जागा द्यावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page