हल्ल्यातील मृत निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावला तिरंगा मशाल रॅली:

हल्ल्यातील मृत निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावला तिरंगा मशाल रॅली:

Tricolor torch rally in Kopargaon to pay tribute to the innocent civilians killed in the attack:

सर्वपक्षीय, सामाजिक,‎सांस्कृतिक क्षेत्रातील‎नागरिकांचा सहभाग‎

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 14 May 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व या हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना  व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समस्त कोपरगावकरांच्या वतीने तिरंगा मशाल रॅली काढून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून बुधवारी  १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वीरपत्नी सरलाताई जाधव वीर पत्नी मंगलाताई वलटे तसेच माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते भारत माता चे भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर भारत माता की जय या घोषणांनी या रॅलीला प्रारंभ झाला.

भारतमाता की जय‌’च्या घोषणा.. देशभक्तीपर गीते,, महिंद्राच्या जुन्या जीपमध्ये अग्रभागी  भारत मातेची वेशभूषा केलेली शितल नरोडे, विद्यार्थिनी व दुसऱ्या जीपमध्ये  विंग कमांडर व्योमिका सिंग व कर्नल सोफिया कुरेशी, अभिमान उंचवणारा समता उद्योग समूहाचा ,३०० फुट लांबीचा  तिरंगा ध्वज, संपूर्ण  ताफ्याने संपूर्ण कोपरगावकरांचे लक्ष वेधले, ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राची प्रतिकृती, दुसऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एस-४०० (S-400) एक उन्नत रूसी एयर डिफेंस मिसाइल सिस्टम त्याच्या प्रतिकृती ने कोपरगाव करांच्या ऑपरेशन सिंदूरच्या भावना जागृत केल्या

माजी सैनिक, आत्मा मालिक चे सैनिक स्कूलचे विद्यार्थी, शहरातील विविध सर्वपक्षीय नागरिक सामाजिक संघटना   सहभागी झाल्या होत्या प्रत्येकाच्या हातात मशाल अग्रभागी पेट्रोलिंग मोटरसायकल अशा स्वरूपात शिस्तबद्ध पद्धतीने ही विराट रॅली अहिंसा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून कन्या विद्यामंदिर गांधीनगर एस जी विद्यालय राम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज चौक नेताजी सुभाष नगर रस्त्याने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात या तिरंगा मशाल मार्चची सांगता सायंकाळी सात वाजता झाली.

यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ग्रीड इंडियाचे संचालक ॲड. रवींद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, सौ. सुहासिनी कोयटे,  विजय  वहाडणे, अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, कैलासशेठ ठोळे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज डांगरे व मारुतीराव कोपरे,
शिवसेना महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शिवसेना ठाकरे शहरप्रमुख सनी वाघ,स्वच्छतादूत सुशांत घोडके, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, दिलीप  दारूणकर, राजेंद्र सोनवणे, योगेश बागुल,संदीप वर्पे, कैलास जाधव, मंदार पहाडे,  बबलू वाणी,भरत मोरे, असलम शेख, रोहित वाघ, कृष्णा आढाव, मेहमुद सय्यद, नारायण शेठ अग्रवाल, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष वैभव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, डॉ. अजय गर्जे, विजय आढाव, सुधीर डागा, गणेश शिरोडे, मनोज पहिलवान, पप्पू पडियार, अक्षय निकुंभ, मयूर लचुरे, विक्रमादित्य सातभाई, रंजन जाधव, अविनाश पाठक, अशोक लकारे, शफिक सय्यद,फकीर मेहमुद पैलवान, निसार शेख, सुधाभाभी ठोळे, राखी विसपुते, उमा वहाडणे, स्वाती मुळे, योग प्रशिक्षण केंद्राच्या महिला व  मुस्लिम महिला आदिसह‌ शहरातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि समस्त कोपरगावकर नागरिक मोठ्या संख्येने या तिरंगा मशाल मार्चमध्ये सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सामुदायीक श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘जन..गण.मन..’ या  राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
स्वागत विनोद थोरात यांनी केले प्रास्ताविक देविदास गवांदे यांनी केले तर शेवटी आभार स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी व्यक्त केले.

चौकट
पहलगाममधील हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! या हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच, या हल्ल्यात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली

Leave a Reply

You cannot copy content of this page