डंपरला धडकल्याने दुचाकीस्वार ठार

डंपरला धडकल्याने दुचाकीस्वार ठार

वृत्तवेध ऑनलाईन। 21 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 1 :35

कोपरगाव : झगडे फाटा ते पुणतांबा चौफुली रोडवर,डाऊच खुर्द शिवार,ता कोपरगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपर ला दुचाकीस्वार जोराने धडकल्याने  त्याचा मृत्यू झाला. हा अपघात हॉटेल माइल स्टोन समोर, कोपरगाव हद्दीतील डाऊच खुर्द शिवारात रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला.

या भीषण अपघातात उभ्या डंपरला धडक दिल्याने भाऊसाहेब सखाराम केदार,(५४), (रा. गाभण वाडी मुक्काम पोस्ट चंदनापुरी तालुका संगमनेर.) याचा मृत्यू झाला.

गुरुवारी (२०) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास माईल स्टोन हॉटेल समोर आरोपी याने आपले ताब्यातील डंपर क्रमांक एम एच १४ सीपी ६५३४ ड्रायव्हर साईडचे चाक पंचर/ नादुरुस्त झाले नंतर वाहन रोडचे खाली सुरक्षित न लावता धोकेदायक परिस्थितीत रोडवर लावले,वाहनाचे पाठीमागील भागात पार्किंग लाइट ,इंडिकेटर लावला नाही व वाहनाचे मागील भागात सुरक्षित अंतरावर वाहन नादुरुस्त आहे. याबाबतचे निशाणी लावली नाही. अडथळा उभा केला नाही,त्यामुळे झगडे फाटा कडून पुणतांबा चौफुली कडे जाणारे मोटरसायकल क्रमांक एमएच-१७ बी.एच. ८६६५ वरील स्वार भाऊसाहेब सखाराम केदार यांची मोटरसायकल डंपरवर आदळून अपघात होऊन ते जागीच मयत झाले आहेत. डंपर चालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page