सातत्य, ध्येय आणि चिकाटी असल्यास यश हमखास मिळते-नितीन औताडे

सातत्य, ध्येय आणि चिकाटी असल्यास यश हमखास मिळते-नितीन औताडे

वृत्तवेध ऑनलाइन। Thu 29Sep20
By: Rajendara Salkar, 15.00

कोपरगाव : करिअर निर्माण करण्यासाठी अनेक पर्याय खुले असतात.ज्या गोष्टी मध्ये विद्यार्थ्यांना रस असतो ती साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्षेत्र कोणतेही असो अभ्यासामध्ये सातत्य, ध्येय आणि चिकाटी असल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना नेते नितीन औताडे यांनी
प्रथमेश हासे याचे सत्कारप्रसंगी
केले.

यावेळी शारदा स्कूलचे प्राचार्य भारत सावंत, संजय हासे, गणेश हासे, सचिन घुगे, श्री वसावे, पतसंस्थेचे व्यवस्थापक घेगडमल आदी उपस्थित होते.
पोहेगाव मुजमुले वस्ती शाळेत पंधरा वर्षे आदर्श शिक्षक म्हणून काम केलेले व सध्या चांदगव्हाण प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या संजय हासे यांच्या मुलाने प्रथमेश संजय हासे यांनी युपीएससी एनडीए परिक्षेत यश संपादन केले. देशात या परिक्षेसाठी १२ लाख विद्यार्थी आँनलाईन बसले होते.त्यापैकी ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.नगर जिल्हयात प्रथमेश हासे हा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. पुणे येथे नँशनल डिफेन्स अकॅडमी येथे बिटेक डिग्री होणार असून तीन वर्षानंतर उच्च अधिकारी पदावर काम करण्याची संधी प्रथमेश हासे यांना मिळणार आहे.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला. शेवटी आभार पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश हेगडमळ यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page