सराईत गुंडाला गावठी पिस्तुल व काडतुसासह अटक
५ लाख ३६ हजार २०० रूपये असा ऐवज जप्त
कोपरगाव :
सराईत गुंडांला नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल , एक मॅक्झिन, एक जिवंत काडतुसं, sx4 कार मोबाईल असा ५ लाख ३६ हजार २०० रूपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस ४ जुलै रोजी रात्री
गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक संतोष शंकर लोंढे यांना त्यांच्या खब-याकडून माहिती मिळाली की, नामदेव रामदास बोरनारे हा कोपरगाव येवला रोडवर साई धाम कमानीजवळ रात्री नऊ वाजता मिळुन आला त्याच्या जवळ पांढऱ्या रंगाचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व एक काडतुस, अशी घातक शस्त्र विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगल्या प्रकरणी मिळून आला आहे.
यानुसार पोलीस नाईक संतोष लोंढे यांनी त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल व १२०० रुपये किमतीचे एक मॅक्झिन व त्यात एक काडतुसं, ५ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी sx4 क्रमांक एम. एच. ४३ ए. जे. २७०९, तसेच पाच हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा एम आय कंपनीचा मोबाईल असा एकूण ५ लाख ३६ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. यावरून त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखा नगरचे पोलीस नाईक संतोष लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव बोरणारे राहणार पाटोदा तालुका येवला जिल्हा नाशिक याला अटक करून त्याचे विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बोरसे हे करीत आहेत.





