संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर रुग्णांसाठी फलदायी ठरणार – देवेंद्र फडणवीस
Sanjeevani Dedicated Covid Health Center

will be fruitful for patients – Devendra Fadnavis
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18May 2021, 14:32 :00
कोपरगांव : कोपरगांव मतदार संघात कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असुन उपचारादरम्यान रूग्णांची व नातेवाईकांना होणारी हेळसांड लक्षात घेऊन सदर रुग्णांच्या मदतीसाठी संजीवनी उद्योग समुहाने संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची मोठी जबाबदारी उचल्यामुळे रुग्णांसाठी फलदायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
कोपरगांव मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांबरोबर नातेवाईकांची देखील मोठी धावपळ होत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता संजीवनी युवा प्रतिष्ठाण यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटर राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवुन ऑक्सीजनयुक्त बेडची पाहणी केली याप्रसंगी बोलत होते.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ठिकाणी आरोग्य विभाग हा त्यांची जवाबदारी उत्तम पध्दतीने पार पाडीत आहे त्याचबरोबर स्वच्छता विभागाचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात टाकुन काम करतात तसेच संजीवनी कोविड केअर टिम, आरोग्य व जेवन व्यवस्था ही रुग्णांना देत आहे. वाफेचे मशीन याची रुग्णांच्या उपचारासाठी संजीवनी कोविड केअर सेंटरने व्यवस्था केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. राज्यभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्रिय आहे याचाच एक भाग म्हणुन आज सौ. कोल्हे यांनी सुरु केलेले कोविड सेंटर असल्याचे शेवटी फडणवीस म्हणाले.
कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आत्मा मालिक ध्यान पीठाचे सर्व संत परिवार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेशसचिव तथा माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब दवंगे, आत्मा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तहसीलदार योगेश चंद्रे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्याजी गंधे, रविंद्र बोरावके, शरद नाना थोरात, अशोकराव पवार, शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गटनेते रवींद्र पाठक, पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, ओ.बी.सी चे प्रकाश चित्ते, कैलास खैरे, किरण बो-हाडे, सचिन तांबे, साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, विक्रम पाचोरे, अविनाष पाठक, कैलास राहणे आदि उपस्थित होते.





