सत्ता असो नसो मतदार संघाच्या विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करू- सौ स्नेहलता कोल्हे
Whether we are in power or not, we will try our best for the development of the constituency – Mrs. Snehalta Kolhe
त्यांनी केले १ कोटी ६१ लाखाच्या जळगांव चितळी रस्त्याचे लोकार्पण. He made public dedication of 1 crore 61 lakh Jalgaon Chitli road.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 4 August 17:00
कोपरगांव: विरोधकांना काड्या खोड्या काहीही करू द्या, पण जिवाभावाच्या माणसांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करून सत्ता असो वा नसो मतदार संघाच्या विकासासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांव मतदार संघातील जळगांव ते चितळी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या १ कोटी ६१ लाख ५१ हजार रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी दिली.अध्यक्षस्थानी बेबीताई निर्मळ होत्या.
बाळासाहेब चौधरी यांनी स्वागत केले. प्रारंभी चिपळून पूरग्रस्त व कोरोना मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गंगाधर चौधरी व भाऊसाहेब चौधरी यांनी पार्ट पाण्याचा खेळ झाला असून आम्ही टेलला असल्यामुळे आमच्या शेपट्या कापल्या जात असल्याचा आरोप केला तर संपतराव चौधरी यांनी बाजूला बसलेले चुका करतात आणि त्याची बाधा गावाच्या विकासावर होत असल्याची टीका केली याप्रसंगी कोरोना योध्दे डाॅ. राजेंद्र शिंदे, सुरेश गवई, मिरा कापरे, मनिशा सिनगारे, सविता कापरे, स्वाती बोरावके, अर्चना साळुंके, सुनिता गिते, सोनाली वैराळ, द्रौपदी शिंदे, मिराबाई काळे, आरती वैद्य, सुनिता साप्ते, अरूणा वानखेडे, अलिमा शेख, पुष्पा आंबड, परवीन शेख, संगिता वैराळ, ग्रामपंचायत सदस्या सुनिता चौधरी, श्रध्दा चौधरी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गरूड, आण्णासाहेब वाव्हटळे, राजेंद्र चौधरी, गणेश क्षीरसागर, अमोल औताडे, एकनाथ चौधरी, संतोश चौधरी, महेंद्र चौधरी, रोहित चौधरी, दत्तात्रय चव्हाण, जालिंदर वैराळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळुंके, रमेश बनसोडे, रामदास पवार, मंगेश गायकवाड, रशीदभाई शेख, सुभाश कु-हाडे आदिंचा सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, गेल्या पाच वर्षात आपण प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडविले अनेक प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले पोस्टमन म्हणून संघर्ष करून मंत्रालयातील निधी थेट गावपातळीवर आणला आज मात्र श्रेयवाद लाटून फिरवायला आणि नारळ फोडायला भलतेच प्रतिनिधी आल्याची टीका त्यांनी केली. आज जळगावकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या कामाचे लोकार्पण आपल्याच हातून केले ज्याचे आत्मिक समाधान वाटते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज राज्यातील प्रत्येक संकटग्रस्त नागरिकांचे अश्रु पुसुन त्याचे दुःख हलके करीत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी शासनांने मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण घालविले असेही त्या म्हणांल्या. विजय महाराज चौधरी यांनी संजीवनी कोविड व डेडीकेटेड ऑक्सीजन सेंटरच्या माध्यमातून हजारो कोरोनाग्रस्तावर उपचार करून विनामूल्य रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय सुविधा पुरविल्या बद्दल युवा नेते विवेक कोल्हे यांचे कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले सुत्रसंचलन बाळासाहेब चौधरी व सुभाष जामदार यांनी केले.





