विकासकामातील भ्रष्टाचाराची गंगुलेंची कबुली; बोरावके मग जिरली कोणाची ? – रविंद्र पाठक
Ganguly’s confession of corruption in development work; Boravake then whose jirli? – Ravindra Pathak
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sat 7 August 19:50
कोपरगाव : त्या २८ विकास कामात भ्रष्टाचार असल्याचा अनेकदां सेना-भाजप नगरसेवकांच्या वतीने आरोप करण्यात आले आहे. आता त्या २८ कामात भ्रष्ट्राचार असल्याची कबुली दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनीच जाहिरपणे दिली, मग आता कोणाची जिरली हे विरेन बोरावके यांना माहित नाही काय ? असा सवाल भाजपा गटनेते रविंद्र पाठक यांनी जाहीर पत्रकातून केला आहे.
पाठक म्हणांले की, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांच्या पदभार प्रसंगी भाजपाचे युवानेते विवेक कोल्हे यांनी विकासात कोल्हे गटाने कुठेही वाट न आडवता उलट सर्व मंजु-या दिल्या असुन त्याची जाहिर वाच्यता केल्यानेच विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत असे असतांनाही विरेन बोरावके यांचे पत्रक म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी असुन अजुनही आमदारांना अज्ञानात ठेवणांरे आहे. कोपरगांव शहर पिण्यांच्या पाण्यांचा प्रश्न निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईनने मार्गी लावलेला असतांना त्यात खोडा घालण्यांचे काम आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांच्या प्रश्नात समन्यायी पाणी कायद्याला मुकसंमती देण्यांचे पाप त्याच्याच वडीलांनी केले त्यामुळेच कोपरगांवकराचे आजही हाल होत आहे. गेल्या दोन वर्षात शहरात आ. आशुतोष काळे यांचे कुठलेही ठोस काम नाही., आमच्याच निधीतील कामांची उदघाटने ते स्वतःच करत असुन १४-१५ व्या वित्त आयोगाचा निधी आला म्हणजे आमदारांचे कर्तुत्व सिध्द होत नाही अशा प्रकारचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला येत असतो त्यात आमदारांची मर्दूमकी काय. जी शासकीय इमारतींची कामे पुर्ण झाली आहेत ती तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याच पाठपुराव्यामुळे पुर्णत्वास आली आहेत हे सत्य विरोधक व त्यांचे समर्थक स्पष्टपणे नाकारत आहे पण जनतेला खरे खोटे माहिती आहे. आज शहर विकासाची जी काही कामे दिसत आहेत त्याला गेल्या साडेचार वर्षात आम्हीच मंजु-या दिलेल्या आहेत हे विरोधकांनी नाकारू नये.,मलिदा खाण्यासाठी मिळाला नाही म्हणून विरोधकांनी मिठावरच भागवावे अन्यथा मीठ पण नशिबात येऊ देणार नाही असा टोलाही रवींद्र पाठक यांनी शेवटी लगावला .





