उक्कडगाव देवी मंदिर व जुनी गंगा देवी मंदिर नवरात्र साध्या पद्धतीने
Ukkadgaon Devi Temple and Old Ganga Devi Temple Navratra in a simple manner
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 6 Oct 2021,17:20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील जुनी गंगा देवी मंदिरात तसेच तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या उक्कडगाव देवी मंदिरात यंदा साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे .

भाविक भक्तांना दूरवरून दर्शन फक्त घेता येणार आहे कुठल्याही प्रकारची यात्रा येथे भरवली जाणार नाही सलग दुसऱ्या वर्षीही या देवस्थान मंदिरात घटी बसण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने कोणालाही घटी बसता येणार नाही तसेच मंदिर परिसरात कुठलेही दुकाने लावता येणार नाहीत अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विलास नाईकवाडे यांनी दिली. उत्सवानिमित्त मंडप आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.





