कायद्याचं ज्ञान असेल तर शिक्षणाला महत्त्व- न्या. श्रीमती सचदेव
If you have knowledge of law, then the importance of education – Justice.Mrs. Sachdev
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon11 Oct 2021,18:20Pm.
कोपरगाव : महिलावर होत असलेले अत्याचार स्त्रीभृण हत्या ही बाब शरमेची आहे. प्रत्येक वेळीच तंटा कोर्टात येऊ द्यायचा का नाही हे आप आपल्यावर अवलंबून असते. कायद्याचं ज्ञान असेल तर शिक्षणाला महत्त्व न्यायमुर्ती श्रीमती एस. एन. सचदेव यांनी सोनेवाडी येथे “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमात कायदेविषयक माहिती व जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष लोहकणे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाघीरे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे, सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, पोलीस पाटील दगु गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, धर्मा जावळे, केशवराव जावळे, आबा वायसे,तुकाराम गुडघे, सोपान गुडघे, कामगार तलाठी श्री माळी, पुंजासाहेब जावळे ,समन्वय समितीचे सदस्य विठ्ठल जावळे, हेमराज जावळे , ॲड मोहन जावळे, संदीप गुडघे, जिभाऊ घोंगडे, भास्कर घोंगडे, मुख्याध्यापक श्री जगताप, श्री मेहेरे, हरिभाऊ जावळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. जागतिक बालिका दिनाची शपथ गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व श्री वाघीरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. सुत्रसंचलन वकील संघाचे सदस्य ॲड मोहन जावळे यांनी केले तर आभार उपसरपंच किशोर जावळे यांनी मानले.





