सन्मान दिला, तर बरोबर जाऊ अन्यथा एकटेच लढू – विनायक गायकवाड
If given respect, let’s go with it, otherwise we will fight alone – Vinayak Gaikwad
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 8 Dec.2021 20.10Pm.
कोपरगाव : आगामी नगरपरिषद, मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीत भाजपाच्या वहाडणे गटाचे ‘एकला चलो रे’ निर्णयावर एकमत झाले आहे. मित्रपक्षांनी सन्मान दिला, तर बरोबर जाऊ अन्यथा एकटेच लढू असे भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र अशी चर्चा निष्फळ झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचं ते म्हणाले.
यावर बोलताना विनायक गायकवाड म्हणाले, भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयात जेष्ठ नेते रामदास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जेष्ठ नेत्यांनी आगामी नगरपरिषद, मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका लढविण्याबाबत सविस्तर चर्चा-विनिमय केल्यानंतर आगामी नगरपरिषद निवडणुक लढविण्याची आग्रही मागणी बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी केली.
मात्र निवडणुकांसंदर्भात अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र या मित्रपक्षांशी एकत्र जमले नाही. तर गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व प्रकारच्या अडचणी-अडथळे यांना तोंड देत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. त्याच कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे गरजेचे असल्याने भाजप (वहाडणे गट) एकटा लढेल, असे गायकवाड म्हणाले. मात्र याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेतला जाईल असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
या बैठकीस वाल्मिकराव भोकरे, सतिशशेठ कृष्णानी, नामदेवराव जाधव, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, संजय कांबळे, नवनाथ जाधव, प्रभाकर वाणी, रविंद्र बागरेचा, विनीत वाडेकर, छनूदास वैष्णव, भाऊसाहेब कासार, पाटील सर, नंदू जोशी, कैलास सिनगर, राजेंद्र खैरे, मुकुंद कालकुंद्री, संजय कानडे, योगेश वाणी, किरण थोरात, धनू परदेशी, कांबळे, अविनाश पानगव्हाणे, प्रविण बागरेचा, बडजाते, वायखिंडे, उदावंत, जाधव इ. उपस्थित होते.





