सावधान: कोपरगावात ३६ जण कोरोना पॉझिटिव्ह
Caution: 36 corona positive in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 19.50Pm.
कोपरगाव : तालुक्यात व शहरात आज केलेल्या rt-pcr टेस्टमध्ये २३ तर खाजगी लॅब मध्ये टेस्ट केलेल्या १३ असे एकूण ३६ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यामुळे कोपरगाव करांवर कोरोना ची पुन्हा टांगती तलवार आहे .त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग नंतर पाळून मास्क वापरून प्रशासनास गर्दी न करता नियम पाळावेत असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासुन शहर व तालुक्यात कोरोना लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून बुधवार दिनांक १२ रोजी कोपरगाव शहर व तालुक्यात एकूण तब्बल ३१ कोरोना रूग्ण वाढले होते. आजचा आकडा ३६ आला आहे. या मुळे नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे. मागील दोन वर्षात जे कडु अनूभव सर्वांनी घेतले आहे ते पुन्हा येऊ नये यासाठी कोरोना नियमांचे कडक पालन करणे व सर्वांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. आज नगर येथे ३७० जणांची स्वॅप तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे ,तर पंधरा रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
आज शहरातील साई नगर, महादेव नगर, सह्याद्री कॉलनी, जेऊर पाटोदा, संवत्सर, लक्ष्मी नगर, रचना पार्क, येवला रोड, साई सिटी, राम मंदिर रोड, सुरेगाव, टाकळी, विवेकानंद नगर, शिवाजी रोड, महात्मा गांधी ट्रस्ट परिसर, पोहेगाव, शारदानगर, इंदिरा पथ, गोदाम गल्ली, बालाजी अंगण, काले मळा, वडांगले वस्ती, गांधी चौक, अन्नपूर्णा नगर, परिसरात कोरोना रुग्ण आढळले आहेत असे डॉक्टर फुलसुंदर यांनी सांगितले. शहरात आज १३३ कोरोना रुग्ण सक्रीय आहेत.
गेल्या दोन वर्षात १५२७९ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आतापर्यंत २ लाख ४६ हजार ४४९ जणांचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. एकूण rt-pcr चाचण्या १ लाख १९ हजार ४१९ आले आहेत. पॉझिटिव रेट सहा पॉईंट वीस आहे. क्रेड पर्सेंटेज ९७.३ आहे .आज पर्यंत २२९ लोकांनी आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोना पासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी केले आहे.