श्रीसाईबाबा संस्थानला रामनवमीच्या तीन दिवसात सव्वाचार कोटीची देणगी

श्रीसाईबाबा संस्थानला रामनवमीच्या तीन दिवसात सव्वाचार कोटीची देणगी

Donations of Rs. 4.5 crore to Shri Sai Baba Sansthan in three days of Ram Navami

पावणेतीन लाख  साई भक्तांनी घेतले दर्शन,

रोकड पावणे दोन कोटी, साडेआठ  तोळे सोने, अडीच किलो चांदी पावणे चार लाडू   पाकिटांची विक्री

Three and a half lakh Sai devotees had darshan,

Cash worth two and a half crores, eight and a half tolas of gold, two and a half kilos of silver and four and a half laddu packets sold

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  8 April 18 .00 Pm.By  सालकर राजेंद्र

शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्‍सव शनिवार दि.०५ एप्रिल ते सोमवार  दि.०७ एप्रिल या कालावधीत संपन्‍न झाला. या उत्‍सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यामध्ये रोख स्वरुपात रुपये ०१ कोटी ६७ लाख ८९ हजार ०७८ दक्षिणा पेटीत देणगी प्राप्त झाली असून, देणगी काऊंटरवर ७९ लाख ३८ हजार ८३० रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास देणगी ४७ लाख १६ हजार ८००, ऑनलाईन चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट क्रेडीट कार्ड, युपीआय याद्वारे ०१ कोटी २४ लाख १५ हजार २१४, सोने ८३.३०० ग्रॅम रक्कम रुपये ०६ लाख १५ हजार ७८२ व चांदी २०३०.४०० ग्रॅम रक्कम रुपये ०१ लाख, ३१ हजार ४७८ यांचा समावेश आहे.
श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखाहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला, उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ६१ हजार ५२९ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ७६ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ३ लाख ६३ हजार ०७४ लाडूप्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्‍या माध्‍यमातून ७२ लाख ६१ हजार ४८० रूपये  प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला.
तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे उप   मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page