शिर्डीत दुहेरी हत्याकांड; १२ तासांत गुन्ह्याची उकल, दोन आरोपींना अटक
Double murder case in Shirdi; Crime solved within 12 hours, two accused arrested
- Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sat April 23.20 Pm.By सालकर राजेंद्र
-
शिर्डी: शिर्डी दुहेरी हत्याकांडाचा १२ तासांत छडा लावत दोघांना अटक केली आहे. रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर येथे राहणाऱ्या दोन युवकांनी चोरीच्या इरादयाने हत्या केल्याचे समोर आले आहे. ..
-
चोरी करण्यासाठी बाप लेकाचा खून करणाऱ्या दोघांना १२ आत पोलिसांनी जेरबंद केले.
संदीप रामदास दहाबाड, (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे, (वय २५) दोघेही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर येथील आहेत. या दुहेरी खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत केली.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found
Download File: http://vruttavedh.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250405-WA0429.mp4?_=1याबाबत पोलिसांनी सांगितले की, ४ एप्रिल रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले, रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांचे राहते घरी अज्ञात आरोपीतांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले, (वय ३०) साहेबराव पोपट भोसले, (वय ६०) यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले,(वय ५५) सर्व रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला.याबाबत राहाता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी शिरीष वमने, यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.
त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अहिल्यानगर पोनि.दिनेश आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांचे तीन पथक तयार करून, पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
५ एप्रिल रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि.नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहाबाड, (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे, (वय २५) दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री १२.३० वा.सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन – तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगीतली.ताब्यात घेण्यात आरोपी नामे संदीप रामदास दहाबाड, (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे, (वय २५) दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.
तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली आहे.
चोरी करण्यासाठी बापलेक दोघांचा खून केला असल्याची कबुली दिल्याने या दुहेरी खुनाचा गुन्हा १२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, . वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, . शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Post Views:
26