तब्बल अर्धा तास रस्त्यातच रंगलेली दोन वळुंची झुंज; तरूणांच्या लाठ्या काठ्यांना जुमानेनात
Two bulls fought on the road for half an hour; Jumanenat the sticks of the youth
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed3Aug24,18.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक आहे. ही गुरं शहरातील मुख्य मार्गावर, आहिंसा चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सतत वावरत असल्याने नागरिक भयभीत होतात. या भितीच्या सावटाखाली त्यांना शहरातील रस्त्यावरुन ये जा करावी लागते.
अशातच गुरुवारी (३ ऑगस्ट) रोजी शहरातील अहिंसा चौकात दोन वळु आमने सामने आले आणि सकाळी साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान दोन वळुंची झुंज रंगली. सुमारे अर्धा तास या रस्तावर संचारबंदीच लागली होती.यावेळी रस्त्यावरुन किंवा कामानिमित्त शहरात आले असलेले लोकं काही वेळ भयभीत झाले होते. या झुंजीमुळे नागरिक पण दुरुनच पळ काढत होते.
तर दोन वळुंची झुंज पहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.अखेर काही उत्साही तरूणांनी हातात मिळेल ते दांडके काट्या घेऊन दोन्ही वळूंवर लांबून मारा केला.व ही झुंज सोडविण्याचा प्रयत्न केला जवळपास अर्धा तास चाललेले या झुंजीनंतर झुंज सोडविण्यास तरूणांना यश आले.
दरम्यान या दोन वळुंच्या झुंजीचा थरार काहींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये व्हिडीओ ही कैद केला. एकमेकांना भिडताना हे वळू सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे होताना दिसतायत. लोकांना अक्षरशः जवळ जाण्याची देखील हिंमत होत नाही. त्यांनी शहरातील मुख्य रस्त्याला आपल्या कुस्तीचा आखाडा बनवलेला दिसून येतोय,पंधरा दिवसांपूर्वीही गुरुद्वारा रोडवर या दोन वळूंची मोठी झुंज झाली होती.
व्हिडिओत दोन्ही काळ्या रंगाचे वळू दिसून येतोय. हे एकमेकांच्या शिंगाला शिंगं लावून उभे आहेत. येणारे जाणारे प्रवासी त्यांच्याकडे बघतायत पण जवळ जायची हिंमत काय कुणी करत नाही. अर्धा तास ही कुस्ती चालू असते. भांडता भांडता ते फूटपाथच्या डिव्हायडर वर जाताना दिसून येतायत. तिथेच महामार्गावर या दोन वळू व्यतिरिक्त अजूनही मोकाट प्राणी पाहायला मिळतायत. इथल्या नागरिकांना हा रोजचा त्रास आहे. तेव्हा या मोकाट गुरांची पालिका प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Post Views:
114