रांगोळी हे एक मांगल्याचे प्रतीक – स्नेहलता कोल्हे
Rangoli is a symbol of a Mangalya – Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 3 Oct24, 17.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :भारतीय संस्कृतीत रांगोळीला धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असल्याने देव्हाऱ्यापुढे, अंगणात व कोणत्याही शुभप्रसंगी रांगोळी काढली जाते. कारण रांगोळी हे एक मांगल्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रवंदा येथे हिंदू रक्षक ग्रुपच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी सोमवारी केले. टॅलेंट असलेल्या ग्रामीण कलावंतांनी न्यूनगंड न बाळगता पुढे येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाल्या
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, कोपरगावच्या भूमीत अनेक मोठे कलावंत घडले आहेत, घडत आहेत.माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आपण कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील कलाकारांना मूलभूत सोयी-सुविधा व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील कलागुणांना सातत्याने उत्तेजन दिले. कोपरगाव व परिसराला ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक व कलेचा मोठा वारसा लाभला आहे. कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीय सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
यावेळी साहेबराव कदम, साहेबराव लामखडे, उपसरपंच संदीप कदम, शशिकांत सोनवणे, दुर्गाताई आरिंगळे, शेखर कदम, बाळासाहेब निमसे, भुसे, ऋषिकेश लक्ष्मणराव कदम, प्रियंका ऋषिकेश कदम आदींसह हिंदवी रक्षक ग्रुपचे सर्व सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका थोरात यांनी केले, तर मंडलकर यांनी आभार मानले.
Post Views:
193