कोल्हे कारखाना ऊसाला जिल्ह्यात उच्चांकी दर देणार – विवेक कोल्हे
Kolhe factory will give highest price in Usala district – Vivek Kolhe
६१ वा गळीत हंगाम सुरूSeason starts in 61st neck
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 1Nov24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोल्हे कारखान्याने गेल्या ६१ वर्षात अनेक चढ उतार पाहिले स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्याकडून या संकटावर बात करण्याचे बाळकडू मिळाले आहे खाजगीकरणाचे वाढते जाळे आणि स्पर्धात्मक युगात जागतिक आवाहने व नैसर्गिक अडचणीला सामोर जात मात करून जिल्ह्यात ऊसाला उच्चांकी भाव देणार असल्याचे ग्वाही सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित शेतकरी सभासदांना दिली. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे हे होते.
प्रारंभी ६१ व्या गळीत हंगामाची पूजा कारखान्याची जेष्ठ संचालक निवृती बनकर व सौ. मंदाताई बनकर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी कारखाना व्यवस्थापन कर्मचारी शेतकरी व सरकारी धोरण या तीन चाकावर चालते. ज्यावेळेस कारखाने कमी दिवस चालतात त्यावेळेस कारखान्यावर तोट्या सहन करण्याची पाळी येते खर्च वाढल्यामुळे तोटा सहन करण्याची पाळी येते परंतु शंकरराव स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी तोटा आला तरी चालेल पण सभासदांच्या हितासाठी कारखाना चालला पाहिजे ही भूमिका कायम ठेवली यासाठी त्यांनी उपपदार्थ निर्मिती केली परंतु तात्कालीन सरकारी धोरणामुळे अनेक उपपदार्थ निर्मिती बंद करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्याबाबत घेतलेल्या धोरणामुळे साखरदराबरोबरच ऊस दराबरोबरच साखर दर निश्चित केल्यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. आता उपपदार्थ तोटा भरून काढण्यास उपयुक्त ठरतात म्हणून सभासद व शेतकरी यांच्या हितासाठी तोटा सहन करून आपण कारखाना चालवतो यावर्षी सात लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याचबरोबर यावर्षी रिकव्हरी कमी दिसत आहे असल्याचे २४००-२५०० चे दर दिसतो पण काळजी करू नका, आपण जिल्ह्यात उच्चांकी दर देऊ असे आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिले.
विवेक कोल्हे म्हणाले की, आता मंत्रीपदाच्या अपेक्षेने जे बरोबर गेले त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केले नाहीत हा भाग सोडा, आपण मात्र मागच्या वेळी पाण्यासाठी पक्ष त्याग केला होता. स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले आज पुन्हा साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडणार आहे त्यामुळे शेतीचे सोडा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा बिकट होणार आहे मेंढेगिरीच्या अन्यायकारक कायद्याबाबत फेरविचार सुरू असून याबाबत आपण सरकारला निवेदन दिले आहे सूचना केल्या आहेत पाठपुरावा सुरू आहे, परंतु एवढ्यावरच न थांबता मतभेद विसरून नगर नाशिक मराठवाडा हा वाद न करता मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले
यावेळी संजीवनी शैक्षणिक स्कूलचे अध्यक्ष नितीन कोल्हे, ज्येष्ठ दत्तूनाना कोल्हे, सर व्यवस्थापक शिवाजी दिवटे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, उपाध्यक्ष मनेष गाडे, रवीकाका बोरावके, प्रदीप नवले, अंबादास देवकर, सभापती साहेबराव रोहोम, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते डॉ. एकनाथ गोंदकर सर्व संचालक कामगार प्रतिनिधी मनोहर शिंदे विविध विभागाचे प्रमुख भाजपाचे पदाधिकारी सर्व संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना बिपिन कोल्हे म्हणाले की, गेली ४० वर्ष स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी पाण्यासाठी लढा दिल्यामुळेच तुम्हाला आम्हाला पाण्याची झळ लागली नाही परंतु २००५ साली झालेल्या समन्यायीच्या काळया कायद्यामुळे दर चार वर्षांनी कारखाने अडचणीत यायला लागले आज पाणी गेले तर शेती सोडाच प्यायला पाणी मिळणार नाही. तेंव्हा आता पाण्यासाठी लढावेच लागेल. पाण्यासाठी उपसलेली तलवार पाणी घेऊनच म्यान करणार असल्याचे सांगितले.
जायकवाडी धरण बांधताना कुठल्याही प्रकारचा तांत्रिक अभ्यास केला गेला नाही, कुठल्याही प्रकारचे नियम लावले गेले नाहीत, दुसरीकडे मेंढेगिरी समितीने कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता हा अन्यायी कायदा आमच्यावर थोपला आहे. त्याची शिक्षा गेली १९ वर्ष आम्ही भोगत आहोत. बारमाही ब्लॉक देताना सरकारने आमच्या जमिनी घेतल्या आता बारमाही ब्लॉकही गेले आहेत. त्यामुळे आमच्या जमिनी परत करा, पाणी आणायचे तर खांद्याला खाऊन खांदा लावून लढले पाहिजे. लोकांनी घोषणा द्यायच्या आगे बढो पण नेता मात्र पीछे मुडो अशी भूमिका चालणार नाही. शंकरराव कोल्हे व कोल्हे परिवाराने सातत्याने पाण्यासाठी लढा दिला.परंतु स्वर्गीय शंकरराव काळे, अशोक काळे असो आशुतोष काळे परिवाराच्या कोणत्या सदस्याने पाण्यासाठी लढा दिला, आंदोलन सोडा साधा खडा देखील त्यांनी टाकला नाही. लोक लवकर विसरतात जुन्या त्यागाचे लवकर विस्मरण होते.२००५ साली केलेले पाप आपल्याला भोगावे लागत आहे शेतकरी हीच आपली जात आहे. पाणी नसेल तर सर्व उध्वस्त होईल.मतदार संघात ८० टक्के शेतकरी आहे. ३ हजार कोटी आणल्याच्या गोष्टी केल्या जातात. प्रत्यक्षात पाण्यासाठी किती कोटी आणले ? याचा हिशोब द्या, असे किती दिवस चालणार पाण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढावेच लागेल. फ्लेक्स बोर्डवर कोटीचे कोटी उड्डाणे झाली आता फसवणूक बंद करा,चार वर्षात पीक विम्याचे किती कोटी मतदारसंघात आणले याचा अभ्यास केला का? पाणी प्रश्न सुटत नाही तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा, पण ते तसे करणार नाहीत. कारण त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत.अशी टीका करून बिपिन कोल्हे म्हणाले, पुढच्या भवितव्यासाठी तरुण पिढीने पुढे आले पाहिजे जे घडवायचे आहे ते तुम्हाला घडवायचे आहे एक मे शांती दो मे क्रांती लक्षात ठेवा बिगर लढा शिवाय पाणी मिळणार नाही साथ दिली तरच पाणी मिळेल ढेपाळू नका मला शेलार मामाच्या भूमिकेत जावे लागेल तलवार काढली तर पाणी घेतल्याशिवाय ती म्यान करणार नाही.
याचा पुढील उच्चार त्यांनी केला ते पुढे म्हणाले कोल्हे कारखाना सामाजिक दायित्व पार पाडून सर्वांच्या बरोबरीने उसाला भाव देतो हेच आपले वैशिष्टै असल्याचे त्यांनी सांगितले. तेंव्हा स्वतःसाठी लढा द्या, झोकुन द्या, पाण्याच्या आंदोलनात सामील व्हा, असे आव्हान बिपिन कोल्हे यांनी शेवटी केले .