तुम्ही फक्त आशुतोषला आशिर्वाद द्या, सगळ्या योजना पूर्ण करु, हा अजितदादाचा वादा    

तुम्ही फक्त आशुतोषला आशिर्वाद द्या, सगळ्या योजना पूर्ण करु, हा अजितदादाचा वादा 

You just bless Ashutosh, complete all the plans, this is Ajitdada’s argument

कोल्हे परिवाराचे आभार त्यांचा योग्य तो सन्मान करणारThanks to the Kolhe family and will pay him due respect

Rajendara C. Salkar,
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Thu14Nov.21.30 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव:  आशुतोष काळेच्या रूपाने एक तरुण तडफदार  उच्चशिक्षित चांगले व्हिजन  असलेला लोकप्रतिनिधी त्याठिकाणी  दिला राज्याच्या विधीमंडळात देखील एक धडाडीच आमदार  या या दृष्टीने आशुतोष काळे यांनी  आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला मी पाहिलाय याचा मला आनंद आहे अभिमान आहे. मागच्या वेळेस आशुतोष केवळ साडेआठशे मतांनी कसं बस..  निवडून दिल निवडून आला याची मी खंत व्यक्त करतो. आता त्याला तुम्ही फक्त ८५००० चे मताधिक्य देऊन आशीर्वाद द्या त्याला जास्तीचा निधी देतो आणि जास्तीची जबाबदारी देतो  हा अजित दादाचा वादा आहे  असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे  आमदार आशुतोष काळे  यांच्या प्रचारसभेत गुरुवारी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे हे होते. 

आपण सर्वजण समाजाच्या विकासासाठी काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान सभा घेत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, अमित शाह देखील मिटींग घेत आहेत असे अजित पवार म्हणाले. महायुतीच्या सरकारनं दोन अडीच वर्षे चांगले काम केले आहे. काही राजकिय स्थित्यंतरे घडली आहेत. माझे सहकारी म्हणयाचे दादा आम्ही निवडून आलो, कोरोनाचा काळ आला, त्यामुळं कामं झाली नाहीत. ज्या जनतेने विश्वासाने माझ्या सहकाऱ्यांना निवडून दिले त्या जनतेसाठी आणि सहकाऱ्यांसाठी मला सत्तेत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला  यात काय चुकले आमची समाजाशी बांधिलकी आहे त्या समाजाचा विकास करण्यासाठी मला निर्णय घ्यावा लागला आज आशुतोष काळेंनी मतदारसंघात दोन ते अडीच हजार कोटीची  कामे केली आहेत. ही कामे झाली असती का असा सवाल अजित पवार यांनी  केला

अजित पवार म्हणाले, लोकसभेला  संविधान धोक्यात आहे,अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली गेली. आम्ही त्या त्रुटी जास्तीत जास्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. जूनमध्ये मी अर्थसंकल्प मांडला. त्यात काही घोषणा केला. सर्व धर्माच्या महिलांना, युवक युवतींचा विचार करून घोषणा केल्या. त्या योजनांच्या बद्दल आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कर्जाचा  डोंगर राज्यावर होईल, राज्याची आर्थिकशिस्त बदलण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे म्हटले गेले. पण आमच्याकडे त्याला उत्तर होते.आम्ही ज्या योजना मांडल्या  मागच्या वेळेस आम्ही अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी या सर्व योजना देत असताना सरकारला ७५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागत होता. साडेसहा लाख कोटींचं बजेट होतं. त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपये या सर्व गोष्टींसाठी होते. मुलींचं मोफत शिक्षण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रपये, वीज माफीसाठी १५ हजार कोटी रुपये लागत होते, बारावी, डिप्लोमा डिग्री आणि शिक्षणार्थींना ८ हजार कोटी रुपये, तीन गॅस सिलेंडर योजनेसाठी २ हजार कोटी रुपये होत होते, दुधाचं इन्सेनटिव्ह ७ रुपये, या सर्वांसाठी मला ७५ हजार कोटी रुपये लागत होते. त्यावेळी  विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की, यांनी राज्याला दिवाळखोरीत काढलं. राज्य कर्जबाजारी केलं. यांच्याकडे पैसे कुठून आले? हे आता पगार थांबवतील. बिलं थांबवतील. केलेल्या कामाची बिलं मिळणार नाहीत. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधकांनी आरोप केलं”. महाविकास आघाडी दिशाभूल करीत असल्याची टीका अजित पवारांनी केली.

लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट पैसे १ ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला ७ रुपये अनुदान दिले आहे. शेतकरीच्या खात्यावर थेट पैसे देतोय, पारदर्शकता आहे. यामध्ये गळती नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. साडेबारा टक्के जागा आदिवासी समाजाला दिल्या, तर मुस्लिम समाजाला १० टक्के जागा दिल्या आहेत. आम्ही सर्वाना बरोबर घेऊन जातोय, भेदभाव करत नाही. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

तुमचा उत्साह चांगला आहे तो  २० तारखेपर्यंत टिकवा अशुतोष चे काम चांगले आहे आशुतोष काळे यांना निवडून आणा, सर्व ताकद आपल्यासोबत आहेत असेही अजित पवार म्हणाले. राज्यात महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार? हा जाहिरनामा देतोय. केंद्र सरकार पाठिशी आहे, त्यामुळं तुमच्या सर्व योजना पूर्ण करु, कामे आणू असे अजित पवार म्हणाले.  अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव येथील प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची देखील माहिती दिली. तसेच आशुतोष काळे यांना पुन्हा निवडून आणण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.

यावेळेस उमेदवार आशुतोष काळे यांनी मतदार संघात झालेल्या विविध कामांचा लेखाजोखा मांडताना शहराचा पाणी प्रश्न निळवंडे पालखेड गोदावरी कालवे या पाणी अडचणी सांगून पाणी कालवे रस्ते शासकीय इमारती भूमिगत गटारी वीज प्रश्न सोडविल्याबद्दल दादांचे मतदार संघाच्या वतीने आभार मानले येत्या काळात युतीचे सरकार येऊन आपल्याला मोठे पद मिळणार असल्याने आमचे मांडलेल्या प्रश्न आपण सोडवाल याबद्दल वाद नाही महायुतीचे नेते असतील माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे असतील त्यांचे कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिला नाही त्यांनी या निवडणुकीत थांबून मला पाठिंबा देण्याचे ठरवलं या सभेच्या निमित्ताने मी त्या सर्वांचे आभार मानतो  असे या वेळेस आशुतोष काळे यांनी जाहीरपणे सभेत व्यक्त केले

यावेळी व्यासपीठावर चैताली काळे, अशोक रोहमारे राजेंद्र जाधव कपिल पवार, राजेश परजणे,नितीन औताडे, धनंजय जाधव, कृष्णा आढाव, विजय वहाडणे, कोल्हे गट भाजपचे मनेष गाडे, साहेबराव रोहोम,विश्वास महाले, कैलास माळी,दत्ता काले, हेही उपस्थित होते तसेच प्रतिभा शिलेदार,सुनिल गंगुले, हाजी मेहमूद सय्यद  यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते कार्यक्रमाची प्रास्ताविक स्वागत तालुकाध्यक्ष  राष्ट्रवादी  चारूदत्त सिनगर यांनी केले शेवटी आभार बाळासाहेब राहणे यांनी मानले 

चौकट

 मी या निमित्ताने कोल्हे परिवाराला देखील धन्यवाद देतो.मग त्यामधे बिपिनदादा कोल्हे स्नेहलता ताई कोल्हे विवेक कोल्हे आणी सर्व परिवार आणि त्यांचे समर्थक ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली त्यावेळी अमित शहा असतील देवेंद्र फडवणीस असतील आणि आम्ही स्वतः त्यांना विनंती केली त्यांनी प्रतिसाद दिला त्यांनी त्यांच्या नेत्यांचा ऐकलं मी एवढेच कोपरगावकरांना सांगू इच्छितो की,भारतीय जनता पक्षाने त्यांचाही मानसन्मान करण्याचे ठरविला आहे आणि पुढच्या काळात त्यांचा मानसन्मान राखला जाईल त्याबद्दल कोपरगावकरांनी काही काळजी करू नये माझे देखील त्यांच्या नेत्यांशी संबंध आहेत मी ही देखील प्रयत्न करणार आहे-अजित पवार

Leave a Reply

You cannot copy content of this page