मिस हेरिटेज इंटरनेशनल – 2024 या स्पर्धेत कोपरगावची कन्या कु. हर्षा बनसोडे तिसरी
Kopargaon’s daughter Ms. Harsha Bansode came third in the Miss Heritage International – 2024 competition.
बेस्ट टॅलेंट अवॉर्ड व क्विन ऑफ हार्टस देऊन सन्मानHonored with the Best Talent Award and Queen of Hearts
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sun17 Nov 19.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : ९ ते १८ नोव्हेंबर या दरम्यान थायलंड देशामध्ये संपन्न झालेल्या ” मिस हेरिटेज इंटरनेशनल – 2024 या स्पर्धेत कोपरगाव ची कन्या कु. हर्षा कल्याणी शैलेंद्र बनसोडे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे कोपरगावच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या बरोबरच तिला मानाचे आणखी दोन किताब ,बेस्ट टॅलेंट अवॉर्ड व क्विन ऑफ हार्टस देऊन सन्मान केला आहे .
या स्पर्धेत एकूण चाळीस देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गतवर्षी भारतात झालेल्या स्पर्धेत मिस हेरिटेज इंडिया म्हणून कुमारी हर्षा बनसोडे विजयी झालेली होती. या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तिला पुणे येथील मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड यांनी पुरस्कृत केले होते. थायलंड येथे दहा दिवस चाललेल्या स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये तिने उत्कृष्ठ कामगिरी बजावली, त्यामुळे कोपरगावच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या स्पर्धेसाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग व फोटो अविनाश निकम व त्यांच्या टिमने केले. हेरिटेज साईट्सवर शुटींग करण्यासाठी सुधीर डागा, संजिवनी अकॅडमी, जगताप फार्म,यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येथील जुन्या गावठाण भागातील ऐतिहासिक राघोबादादा वाड्याचे पहारेकरी सोनवणे यांनी साईटसाठी व अनिल गिड्डे यांनी लागणाऱ्या प्रॉपसाठी मोलाचे सहकार्य केले. कुमारी हर्षा बनसोडे हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views:
44