गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोर्विस उपबाजारची मुहूर्तमेंढ – साहेबराव रोहोम
On the occasion of Gudi Padwa, the auspicious occasion of Morvis Sub-Bazar – Sahebrao Rohom
नैऋत्येच्या अकरा गावांना उपबाजार समिती द्या -आ आशुतोष काळे
फक्त पाणी हा प्रश्न घेऊनच सगळेजण मैदानात उतरू – बिपिन दादा कोल्हे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon 31 March 18.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगांव: कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लवकरच मोर्विस (धामोरी फाटा) येथे उपबाजार मार्फत लिलाव सुरू करण्यात येतील अशी माहिती कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी दिली यावेळी त्यांनी कोपरगाव बाजार समितीत असलेल्या सोयी सुविधा बाबत उपस्थिततांना माहिती दिली.
रविवारी ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुर्हतावर मोर्विस (धामोरी फाटा) उपबाजार भुमिपुजान कार्यक्रमात प्रास्तविक करताना ते बोलत होते.
आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे हे होते .
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश (आबा) परजणे, पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, सहाय्यक निबंधक खात्याचे नेरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की लासलगाव, विंचूर, बसवंत पिंपळगाव याठिकाणी जाणाऱ्या त्या शेतकऱ्यांसाठी मोर्वीस उपबाजार समिती हक्काचे व्यासपीठ होणार आहे. महायुती शासनाच्या माध्यमातून लागणारी सर्व मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली तरकोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नैऋत्य भागातील रांजणगाव देशमुख व परिसरातील अकरा गावात सुद्धा उपबाजार समिती सुरु करून त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली

बिपिन दादा कोल्हे म्हणाले की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्वीचा इतिहास पाहता भुसारासाठी सर्वोत्तम बाजारपेठ होती. काळानुरूप खाजगी बाजार समित्या आणि पाण्याच्या तुटवडा यामुळे बाजार समितीला स्पर्धात्मक वातावरण झाले आहे. मंचावर सर्वच पक्षाचे नेते आता एकत्र आहे त्यामुळे जसे इतर प्रश्न सुटतात तसे या पंचवार्षिकमध्ये केवळ फक्त पाणी हा एकमेव प्रश्न घेऊन आपण विधानसभा आणि मंत्रालय पातळीवर मैदानात उतरल्यास पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून मोठा प्रश्न सुटू शकतो असे आवाहन बिपीनदादा कोल्हे यांनी केले . शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी बाजार समितीला सर्वोतोपरी सहकार्य आपले आहे आणि पुढेही कायम असेल असेही ते म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन पा. परजणे संचालक सर्वश्री. खंडु पा. फेपाळे, साहेबराव पा. लामखडे, बाळासाहेब पा. गोर्डे, सर्जेराव पा. कदम, रामदास पा. केकाण, प्रकाशराव पा. गोर्डे, संजयराव पा. शिंदे, शिवाजी पा. देवकर, अशोकराव पा. नवले, ऋषिकेश पा. सांगळे, लक्ष्मणराव पा. शिंदे, रावसाहेब मोकळ, विजयराव पा. डांगे, रेणननाथ पा. निकम, रामचंद्र पा. सांळुके त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व पंचक्रोषीतील ग्रामस्थ, सर्व संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालक बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले, शेवटी संचालक. प्रकाशराव गोर्डे यांनी आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views:
42