सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे – विवेक कोल्हे
The atmosphere of unity created through festivals should always be preserved – Vivek Kolhe
रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon 31 March 19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव शहरातील नवीन कब्रस्थान (105, हनुमान नगर) आणि इदगाह मैदान (कोर्ट रोड) येथे रमजान ईद निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, रमजान ईद हा एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश देणारा सोहळा आहे. महिनाभर उपवास करून अल्लाहची इबादत करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि समर्पणभावनेचा गौरव या निमित्ताने सर्वांनी साजरा केला पाहिजे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रेम, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणे महत्त्वाचे आहे.

यावेळी मौलाना साहेबांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत हिंदू आणि मुस्लिम समाज हे दोन डोळ्यांसारखे असल्याचे सांगितले. दोन्ही समाज एकत्र राहिल्यासच खरं ऐक्य निर्माण होईल आणि समाजात दूरदृष्टी ठेवून प्रगती केली जाईल. सर्व धर्म समभाव जपत प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याची नैतिक जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून ईद निमित्त इफ्तारचे आयोजन केले जात असून या वर्षी देखील विविध ठिकाणी इफ्तार पार्टी आणि मज्जितमध्ये फळांचे बॉक्स कोल्हे कुटुंबाकडून पाठविले गेले.यासह शीरखुर्मा पार्टीचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे सर्व समाजात सलोखा वाढतो, धार्मिक ऐक्य वृद्धिंगत होते आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. कोल्हे व काळे परिवाराने नेहमीच तालुक्यात शांतता, बंधुत्व आणि विकास जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विवेक कोल्हे यांनी पुढे सांगितले की, सण आणि उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोल्हे परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि येणारे दिवस आनंदाचे, सुखाचे व भरभराटीचे जावोत, अशी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी डि.आर. काले, संजय सातभाई, प्रदीप नवले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, जनार्दन कदम, जितेंद्र रणशूर, बबलु वाणी, विनोद राक्षे, संजय जगदाळे, वैभव आढाव, बापू पवार, फिरोजभाई पठाण,हाजी नसीरभाई सैय्यद, मन्सूरभाई शेख, अहमदभाई बेकरीवाले, अकबरलाला शेख, सद्दामभाई सैय्यद, खालिकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान, अल्ताफभाई कुरेशी, रवींद्र रोहमारे, अविनाश पाठक, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, स्वप्नील मंजुळ, प्रशांत कडु, विक्रांत सोनवणे, अकीश बागवान, सलीम आत्तार, सलीम भाई पठाण, सोमनाथ म्हस्के, गोपीनाथ गायकवाड, सचिन सावंत, सलमान कुरेशी, शफिक सय्यद हुसेन, सय्यद मुक्तार शेख, इलियास खाटीक, लियाकत सय्यद, फिरोज शेख, पप्पू सय्यद, अकील मेहंदी, जुबेर खाटीक, विक्की सोनवणे, विक्की मंजुळ, दिपक पाठक, शंकर बिराडे, सुजल चंदनशिव आदीसह प्रतिष्ठित मान्यवर तसेच मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
34