दृष्टिहीन झालेल्या विरोधकांना विकासकामे दिसणार कशी? स्वप्निल निखाडे
Allegation rebuttal
वृत्तवेधऑनलाईन।Tue10Nov2020,
By:RajendraSalkar,20:00
By:RajendraSalkar,20:00
कोपरगाव : गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त झाला. अनेक योजना राबवण्यात आल्या. जनतेच्या हिताचे निर्णय झाले. आजही कामे प्रगतिपथावर असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र व्यक्तीद्वेषाने दृष्टिहीन झालेल्या विरोधकांना तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे दिसणार कशी ? असा टोला कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी यांनी लगावला.
प्रभाग क्रमांक १० मधील जनतेने नगरसेवक म्हणून मला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी म्हणून व कोल्हे परिवाराच्या शिकवणुकीप्रमाणे मतदारांच्या ऋणातून उतराई होताना रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून सुमारे १० लाखाचा निधी मंजुर केला, मात्र याच प्रभागात नगराध्यक्षपदासाठी आपण ज्यांच्यासाठी मते मागितले त्यांनी या प्रभागासाठी काय केले याचा हिशोब न देता आमचे सुज्ञ मित्र आमच्यावरच टीका करण्यात धन्यता मानत आहेत.
गटारी तुंबल्या, डासांचे साम्राज्य वाढले अशी पोपटपंची करून आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या या मित्राने नगराध्यक्षा कडे याबाबतीत काय पाठपुरावा केला हे आधी जनतेला सांगावे, येथील नागरीकांच्या समस्येला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. याचा विसर पडु देवू नका.सल्ला निखाडे यांनी दिला.
मी प्रभाग १० चा नगरसेवक या नात्याने रस्ता सुचविला, तो रस्ता करून घेण्याची जबाबदारी व त्या कामाचा ठेका देण्याचे काम पालिका व नगराध्यक्ष यांचे आहे. पंधरा दिवसात रस्त्याची खडी उघडी पडली असा तावातावाने आरोप करण्याआधी हिंमत असेल तर ज्यांनी रस्त्याचे काम दिले, ठेकेदार नेमला, त्यांना जाऊन हा जाब विचारला पाहिजे , यात नगरसेवकाचा संबध आला कुठे ? रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी नागरिकांनी नगरसेवक म्हणून माझ्याकडे केल्यानंतर याबाबत पत्रप्रपंच करून पाठपुरावा केल्याचे सांगून निखाडे म्हणाले,
तेंव्हा आरोप करण्याआधी हीच का तुमच्या कामाची पद्धत असा सवाल ज्यांच्यासाठी तुम्ही या प्रभागात मते मागीतली, त्यांना जाऊन विचारण्याची हिंमत दाखवा ! म्हणजे नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभुल करून रस्त्याचे काम कोणी पुर्ण करून घेतले. हे सत्य आपोआप जनतेसमोर येईल, असे निखाडे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
Post Views:
395