बेरोजगार तरुणाई व महिला बचत गटाच्या विचारातून गोदावरी महोत्सव – काका कोयटे
Godavari Mahotsav Kaka Koyte from the thoughts of unemployed youth and women’s self help groups
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 29sep 2021,16:50Pm.
कोपरगाव : बेरोजगार तरुणाई व बचत गटातील महिलांना नवीन बाजारपेठ व विक्रीचे ठिकाण देण्याच्या विचारातून गोदावरी महोत्सव आयोजन करण्यात आले होते. तर या उद्योग मंदिरामुळे एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे याचा सर्वच महिला गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी गोदावरी महोत्सव २०२१ च्या सांगता प्रसंगी त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट ‘गोदावरी महोत्सव २०२१’ची सांगता राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी सौ. सुहासिनी कोयटे,.अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, अशोकशेठ दरक, चंद्रशेखर देशमुख, गणेश दळवी, कमलेश कोते,रविराज भालेराव, सौ.सविता विधाते आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी काहींनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्मॉल मशिनरी एक्स्पो चे माध्यमातून छोट्या मोठ्या ६० मशिनरींचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होत्या तर समता महिला बचत गटासह ७० स्टॉल व तालुक्याबाहेरील २५ स्टॉल सहभागी होते. या महोत्सवा अंतर्गत सहभागी स्टॉल धारकांनी लाखो रुपयांचा व्यवसाय केला गोदावरी महोत्सव २०२१ मध्ये सहभागी झालेल्या महिला स्टॉल धारकांचा सत्कार करण्यात आला.
ग्राहकांमधून भाग्यवान विजेते सौ.रुपाली मोरे पैठणी, सौ.वैशाली डोखे चांदीची समई तर कुंभारी येथील सौ.सुरेखा वाल्मिक नीलकंठ यांना सोन्याची नथ देण्यात आली. ‘साई आश्रया’ मुलांना ५० ड्रेस मोफत दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार उद्यमीच्या पदाधिकारी, समता महिला बचत गटाच्या महिला, शार्प इंजिनिअरिंग वर्क्सचे कर्मचारी, टॅबलॅब टेक्नोलॉजीचे कर्मचारी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रेणुका मुन्शी यांनी केले तर आभार प्रदीप वैद्य यांनी मानले.