राष्ट्रसेविका समितीची कोकमठाण गोकुळधाम गोरक्ष केंद्रास सहल भेट
Rashtrasevika Samiti’s visit to Kokmathan Gokuldham Goraksha Kendra
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 24Jan.2022 16.40Am.
कोपरगाव : येथील राष्ट्रसेविका समितीच्या वतीने तालुक्यातील कोकमठाण येथील गोकुळधाम गोरक्ष केंद्रास सहल भेट देऊन तिथे सुरू असलेल्या राष्ट्रहिताच्या कामाची माहिती घेतली .
यावेळी समितीच्या महिला कार्यकर्त्या उमा वहाडणे मनीषा बारबींड सुलभा देशपांडे रत्ना पाठक उत्तरा जोशी स्मिता कुलकर्णी लीना शेळके उषा शिंदे सई कोऱ्हाळकर पूजा शुक्ला लता भामरे उपस्थित होत्या.पत्रकार व गौप्रेमी महेश जोशी यांनी आज गोकुलधाम गौरक्षा केंद्र, कोकामठाण येथे भेट देऊन गौमांताना गौग्रास देत गौसंवर्धन व गौरक्षणाच्या या कार्याची माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या व प्रशासनाने गौहत्या कायद्याची कड़क अमंलबजावनी करावी अशी भावाना व्यक्त केली .
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून बौद्धिक सामाजिक धार्मिक प्रार्थना वाचन आधी कार्यक्रम दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारत माता पूजन मकर संक्रांति गुरुपौर्णिमा उत्सव साजरे करण्यात येतात अशी माहिती मनीषा बारबींड यांनी दिली. स्वागत उमा वहाडणे यांनी केले तर आभार सुलभा देशपांडे यांनी मानले. यावेळी गोसेवक अमित जैन व प्रवीण पाटणी यांनी महिला समिती कार्यकर्त्यांचे स्वागत करून येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व गो शाळेस गो सेवक प्रेमींनी आर्थिक सहाय्य करून राष्ट्रीय कार्यास मदत करावी असे आवाहन केले.