कोपरगावला अभियांत्रीकीसह शिक्षणाचे माहेरघर बनविण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे योगदान-विवेक कोल्हे.

कोपरगावला अभियांत्रीकीसह शिक्षणाचे माहेरघर बनविण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे योगदान-विवेक कोल्हे.

Former Minister Shankarrao Kolhe’s contribution in making Kopargaon the home of education including engineering – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 30Jan.2022 16.40Pm.

 कोपरगाव : कोपरगाव अभियांत्रीकी, तांत्रीक, व्यवस्थापकीय, औषधनिर्माण, उच्च शिक्षणाचे माहेरघर बनविण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान असुन फोर्ड फाऊंडेशन शिष्यवृत्तीवर त्यांनी परदेशात जाऊन कृषी शिक्षण मिळवले तद्भवत जनता इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाले हा त्यांच्या शैक्षणिक विकासाचा पाया असुन त्याला संजीवनी युवा प्रतिष्ठानचे बळ देऊन तो अधिक मजबूत करण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन जगात महान बनवले.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यात आले.               

तालुक्यातील संवत्सर बिरोबा चौक येथे दिलीप कासार पती पत्नीने पुर्व प्राथमिक, माध्यमिक व एन.एम. एन. एस शिष्यवृत्ती परिक्षेत जनता इंग्लिश स्कुलचे प्रणव गायकवाड, स्मीता कासार, श्रुती सांगळे, उमाकांत सोनवणे, यश उगले, श्रुती आबक, ओम रोहोम, गणेश बोरनारे, राजरत्न भारूड, मयुर खरात, चैतन्य डिंबर उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. या ११ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विवेक कोल्हे यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.          

 प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी प्रास्तविक केले. या प्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, त्र्यंबकराव परजणे, फकीरराव बोरनारे, पांडुरंगशास्त्री शिंदे, रामभाऊ कासार, बापूराव बारहाते, प्रकाश बारहाते, मुकुंद काळे, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र परजणे, माजी सरपंच वाल्मीक निकम, पोपटराव बारेनारे, मनोज शेटे, राजेंद्र बोरनारे, गोविंद परजणे, पंडीत भारुड, दिनकर बोरनारे, दिपक कासार, अशोक कासार, संजय कासार, विशाल कासार  संजय भाकरे धनंजय शिंदे,  चिमा दैने, योगेश परजणे, अनिल भाकरे कचेश्वर रानोडे, प्रभाकर भाकरे, अभिजित आबक, मार्गदर्शक शिक्षक जनार्दन खरात, दिनकर लोहकरे, सुनिल वाघमारे, जनार्दन खेताडे, पर्यवेक्षक शरद अंबिलवादे, शेख सर, गणेश आंबरे, दवंगे सर, बाळासाहेब गायकवाड आदि उपस्थीत होते.             

   विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाचा पाया सहकाराच्या माध्यमांतून मजबुत करून अनेकांच्या प्रापंचिक अडचणी दूर करत शेतक-याच्या मुलांना ५ ते ५० लाख रुपयांचे दरमहा पैकेज मिळावे म्हणून येथे अभियांत्रीकी – तांत्रीक शिक्षणाची सोय केली व हजारो मुला-मुलींना देश विदेशात उच्च पदस्थ.नोक-यांच्या संधी निर्माण करून दिल्या. त्याच पावलावर पाऊल ठेऊन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी युवकांना क्रिडा क्षेत्रात  प्रोत्साहन देऊन आवश्यक ती मदत केली, तर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी महिला बचतगट चळवळ उभी केली. शिक्षण हाच तुमच्या आमच्या प्रगतीचा पाया आहे. केरळ १०० टक्के साक्षर आहे, तेथील मुले-मुली जगभरात अधिकारी आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीवर जादा भार न देता शिक्षणाच्या संधी येथुन प्राप्त कराव्या व शेतीची क्रयशक्ती वाढविण्यांसाठी आपल्या माता पित्यांना आर्थिक मदत करावी. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण हे वाघीणीचे दुध असल्याची बिरुदावली आपणा सर्वांवर रुजविली आहे. या शिष्यवृत्तीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयुष्यात सगळी ध्येय साध्य करावी आणि आपल्या आई वडीलांबरोबर गावाचे नांव मोठे करावे असे ते म्हणाले. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले. 

चौकट

विद्यार्थ्यांचे तीन देव !   माता, पिता आणि शिक्षक हे तीनच देव विद्यार्थ्यांचे आहेत,  त्याचीच पुजा त्यांनी करत आपले नाव  मोठे करावे असे विवेक कोल्हे म्हणाले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page