पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यांच्या कोल्हे यांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊ हीच श्रद्धांजली- डॉ. भागवत कराड. 

पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यांच्या कोल्हे यांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊ हीच श्रद्धांजली- डॉ. भागवत कराड.

Tribute to the work of bringing water from the west to the east is the highest priority. Bhagwat Karad.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 27 Mar 202215 :40Pm.

कोपरगांव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान केले. तटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाण्यांची समृद्धी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांच्या शंकरराव कोल्हे यांच्या विचाराला सर्वोच्च प्राध्यान्य देऊ हीच त्यांच्या कार्याप्रिती भारत सरकारच्यावतीने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

         डॉ.भागवत कराड शनिवारी रात्री कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येसगांवी आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार, सौ. मनाली कोल्हे, सौ. निकीता कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे, यांच्यासह जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
     
 डॉ. भागवत कराड पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील ग्रामीण अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमांतून संजीवनी देत विकासाची फळे तुम्हा-आम्हांला चाखायला दिली. जिरायती भागात भुगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यांसाठी त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्राध्यान्य देऊन या भागात बंधाऱ्याची जलसंजीवनी उभी केली. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वयाच्या ९३ या वर्षापर्यंत त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात आणावे ही ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांची मागणी घेऊन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे माझ्याकडे आल्या होत्या, त्यांचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करू हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page