५ नंबर साठवण तलावाचा दिलेला शब्द खरा केला – ॲड. विद्यासागर शिंदे

५ नंबर साठवण तलावाचा दिलेला शब्द खरा केला – ॲड. विद्यासागर शिंदे

Fulfilled the promise given for storage number 5 – Adv. Vidyasagar Shinde

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sat 26 Mar 2022 15 :40Pm.

कोपरगाव: ना. आशुतोष काळे यांनी निवडणुकीत कोपरगावकरांना ५ नंबर साठवण तलावाचा दिलेला शब्द खरा केला असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विद्यासागर शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहेत. राजकारणात दिलेली आश्वासने पाळणारे मोजकेच लोक असतात असेही ते म्हणाले,

मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भिजत पडला होता. कधी सहा दिवसांनी तर कधी आठ दिवसांनी उन्हाळ्यात तर सोळा दिवस नळाची आणि पाण्याची गाठ पडत नव्हती अशी भिषण परिस्थिती कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्याची झाली होती. याचा शहरातील नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.आज पर्यंत अनेकांनी आश्वासन दिली मात्र हि आश्वासनं हवेतच विरली गेली त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जैसे थे होता.

साठवण क्षमता वाढल्यानंतर निश्चितपणे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे ५ नं. साठवण तलाव व्हावा यासाठी ते आग्रही होते. त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून राज्यसरकार मध्ये असलेले आपले वजन वापरून ५ नं. साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली. कोपरगाव शहरातील जनतेच्या दृष्टीने हि अतिशय दिलासा देणारी बाब आहे. असे ॲड. विद्यासागर शिंदे यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page