आपेगाव सोसायटी कोल्हे गटाचे तेरा सदस्य विजयी ; काळे परजणे युतीचा दारूण पराभव

आपेगाव सोसायटी कोल्हे गटाचे तेरा सदस्य विजयी ; काळे परजणे युतीचा दारूण पराभव

Thirteen members of Apegaon Society Kolhe group won; Kale Parjane alliance’s drastic defeat

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 28 Mar 2022 15 :00Pm.

कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील आपेगाव सोसायटी निवडणुकीत कोल्हे गटाचे सर्वच्या सर्व तेरा सदस्य विजयी झाले असून काळे -परजणे युतीचा दारुण पराभव झाला आहे. स्व शंकरराव कोल्हे यांना समर्पीत असल्याची माहिती अंबादास पाटोळे यांनी दिली.

विजयी उमेदवारांमध्ये कोल्हे गटाच्या सर्वश्री ज्ञानदेव गायखे, वाल्मीक भूजाडे, लहानु गव्हाळे, सविता पूजाडे, शोभा गव्हाळे, हरिश्चंद्र लोहकरे, दादासाहेब गव्हाळे, रामभाउ खिलारी, संतोष पगारे, सुरेखा गोरे, पदमाबाई पाटोळे, नागनाथ गायकवाड, विजय रूपनर यांचा समावेश आहे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकमल गांगुर्डे यांनी तर त्यांना सहाय्यक म्हणून सचिव प्रवीण गव्हाळे यांनी काम पाहिले. अंबादास पाटोळे म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे पूर्व भागासह आपेगावावर नेहमीच विशेष लक्ष व प्रेम होते. त्यांनी ४० वर्षापुर्वी गावाजवळील नदीवर गोडबोले बंधा-यांची निर्मीती करुन या भागातील शेतक-यांसाठी पाणी अडविण्याचे मोठेे कार्य केले होते, रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करुन दिले होते. पशुधन वाचले पाहीजे याकरीता त्यांनी दुष्काळी परिस्थितीत कारखान्याचा ऊस देखील चारा म्हणून पुरविला होता. गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी त्या काळात पाणी योजनाही मंजूर केली होती., त्यांंचा आधार कधीही विसरु शकणार नाही असेही ते म्हणाले. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गावासाठी मुख्य रस्त्याचे काम त्यांचे काळात केले असून या रस्त्यामुळे गावाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. आता विवेक कोल्हे यांचे मार्दर्शनाखाली गावातील युवक गावाच्या विकासात मोठे योगदान देण्याचे काम करत आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक व गावातील जेष्ठ कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page