कोकमठाण सोसायटीत काळे- कोल्हे युतीचे १३ सदस्य विजयी; शिवसेनेचा दारुण पराभव

कोकमठाण सोसायटीत काळे- कोल्हे युतीचे १३ सदस्य विजयी; शिवसेनेचा दारुण पराभव

13 members of Kale-Kolhe alliance won in Kokmathan society; Shiv Sena’s drastic defeat

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 28 Mar 2022 15 :20Pm.

कोपरगांव: तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या कोकमठाण सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत कोल्हे गटाचे आठ तर काळे गटाचे पाच असे तेरा उमेदवार विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून सचिव आर. डी. दातीर यांनी सहकार्य केले.

विजयी उमेदवारात दगुनाथ गायकवाड, रामभाउ रक्ताटे, शरद थोरात, सुकदेव वाघ, आण्णासाहेब लोहकणे, कालिदास धिवर, शिलाबाई वाल्मीक लोंढे, वाल्मीक बिडवे सर्व कोल्हे गट तर विजय रक्ताटे, संजय देशमुख, आप्पासाहेब लोहकणे, भागिरथी पुंजा पवार, विलास आव्हाड सर्व काळे गट यांचा समावेश आहे. ही निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अशोकराव केंदळे, आर एन. रहाणे, बी. डी. पानगव्हाणे यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page