ना. आशुतोष काळेंमुळे २.५ कोटी ठेकेदारांच्या खात्यात जमा – तुषार होन
No. Due to Ashutosh Kale, 2.5 crore will be credited to the accounts of contractors
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 17 May 2022, 20.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : नामदार आशुतोष काळे यांच्यामुळे ठेकेदारांच्या थकीत १९ कोटी येणी पैकी २.०५ कोटी येणी काही ठेकेदारांच्या बँक खात्यात गायत्री कंपनीकडून जमा झाल्याची माहिती तुषार होन यांनी दिली. गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे छोट्या-मोठ्या ठेकेदारांची थकलेली जवळपास १९ कोटीची थकीत येणी मिळण्याचा मार्ग नामदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मोकळा झाल्याची माहिती ठेकेदार तुषार होन यांनी दिली ना. काळे यांचा ठेकेदारांनी नुकताच सत्कार केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, समृद्धी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अनेक छोट्या मोठ्या ठेकेदारांनी क्रेन, ढंपर, भाडे तत्वावर देवून इलेक्ट्रिक तसेच काही छोटी मोठी कामे घेतली होती. मात्र २०२१ च्या शेवटी समृद्धी महामार्गाचे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे मागील सात महिन्यापासून अनेक ठेकेदारांची गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकीत येणे बाकी होते.
त्याबाबत सर्व ठेकेदारांनी अनेक वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या सर्व ठेकेदारांनीप्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देवून चांदेकसारे परिसरात असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभारण्यात आलेल्या कार्यालयासमोर सुधाकर होन यांच्या नेतृत्वाखाली २९ एप्रिल पासून उपोषण सुरु केले होते. त्याची ना. आशुतोष काळे यांनी गांभीर्याने दखल घेवून एम. एस. आर. डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार, शिवाजी सातपुते, भाभा पाटील यांच्यासमवेत वारंवार बैठका घेवून व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी व राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे ठेकेदारांची थकीत येणी देण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे सर्व ठेकेदारांनी उपोषण मागे घेतले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक आनंदराव चव्हाण, सागर होन, बाजीराव होन,तुषार होन,सोमनाथ कोते, विकास पुंगळ,अमोल राऊत,लखन औताडे, पप्पू जाधव,विशाल वर्पे,पप्पू देशमुख आदी उपस्थित होते.