महाराष्ट्र प्रदेश जमेतुल मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाज ; महासचिव म्हणून मुन्ना मंसुरी यांची नियुक्ती…

महाराष्ट्र प्रदेश जमेतुल मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाज ; महासचिव म्हणून मुन्ना मंसुरी यांची नियुक्ती…

Maharashtra Pradesh Jametul Mansuri, Pinjari, Nadaf Samaj; Appointment of Munna Mansuri as General Secretary …

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 19 May 2022, 15.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : महाराष्ट्र प्रदेश जमेतुल मन्सुरी, पिंजारी, नदाफ समाज महासचिव म्हणून मुन्ना मंसुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र देताना प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसुरी यांनी दिले.

यावेळी प्रदेश निरीक्षक सिकंदर नदाफ कोपरगांव शहर अध्यक्ष अय्युब मंसुरी, उपाध्यक्ष करीम मंसुरी,कोर कमिटी सदस्य सलीम मंसुरी, राजू मन्सूरी, हारून मंसुरी ,फकीर मोहम्मद मंसुरी, व याकुबभाई शेख,फैजानभाई आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

 

मुन्ना मंसुरी यांच्या नियुक्तीनंतर संजय सातभाई त्यांना पेढा भरवुन सत्कार करताना समवेत शिवसेनेचे आदी पदाधिकारी दिसत आहेत. 

या नियुक्तीनंतर बुधवारी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष गटनेते योगेश बागुल उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, विधानसभा संघटक असलम शेख, नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, अतुल काले, एसटी कामगार सेना शहराध्यक्ष भरत मोरे, सनी वाघ, रवी कथले,गणेश जाधव,सिद्धार्थ शेळके नितिश बोराडे, आशिष निकुंभ, मयूर लचुरे, पप्पू पडियार, रंजन जाधव, भूषण पाटणकर, गगन हाडा यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मंसुरी समाज नवनियुक्त प्रदेश सचिव मून्ना मंसुरी म्हणाले की, आजच्या युगात दर्जेदार शिक्षण समाजासाठी आवश्यक झाले आहे. ते म्हणाले की, मन्सूरी समाजातील लोक मोठ्या संख्येने देशात राहतात. मात्र राजकारणापासून दूर आहेत, त्यामुळे त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात सहभागी व्हावे. समाजातील लोकांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केले . समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळू शकतो. असेही ते म्हणाले.
मुन्नाभाई मन्सुरी यांच्या निवडीचे कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वच ठिकाणी स्वागत व अभिनंदन होत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page