पेट्रोल, डिझेलचे दर कमी; ही तर जनतेच्या वचनाची पूर्ती -स्नेहलता कोल्हे

पेट्रोल, डिझेलचे दर कमी; ही तर जनतेच्या वचनाची पूर्ती -स्नेहलता कोल्हे

Lower prices of petrol, diesel; This is the fulfillment of the people’s promise – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 15July, 17.20
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्याचा निर्णयाचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले आहे. राज्य सरकारने इंधन करकपातीचा जनतेला दिलेले वचन पूर्ण केले असल्याचे प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१४ जुलै) झालेल्या बैठकीत पेट्रोलवरील करात प्रतिलिटरला ५ रुपये तर डिझेलवरील करात प्रतिलिटरला ३ रुपये कपात करण्याचा निर्णय निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला मोठी भेट दिली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल सहा हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. असेही त्या म्हणाल्या. भाजपशासित राज्यांनी मूल्यवर्धित करात कपात केली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही बिगर भाजपशासित राज्यांनी करात कपात करण्याचे टाळले होते. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने पेट्रोल आणि डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा, अशी मागणी वारंवार केली होती. तरीही महाविकास आघाडी सरकार इंधनावरील करात कपात न करता केवळ केंद्र सरकारच्या नावाने ओरड करून आपली जबाबदारी झटकत होते; शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, असे स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी सांगितले.

चौकट

पेट्रोलवरील ‘व्हॅट’मधून २ हजार ४०० कोटी, तर डिझेलच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘व्हॅट’मधून ३ हजार ६०० कोटी रुपयांचा तोटा सरकारला वार्षिक तोटा सहन करावा लागणार आहे.- सौ स्नेहलता कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page