फडणवीसांकडुन विवेक कोल्हेंचे पाठीवर कौतुकाची थाप 

फडणवीसांकडुन विवेक कोल्हेंचे पाठीवर कौतुकाची थाप

Appreciate it to Vivek Kolhe from Fadnavis

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 15July, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची निवडणुक समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक पध्दतीने बिनविरोध झाल्याबददल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांचा सत्कार केला आहे.

सहकाराने ग्रामिण अर्थकारणाला मोठी दिशा दिली असून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत सहकाराच्या माध्यमांतुन देशाभिमानास्पद कामगिरी उभी केली आहे, त्यांचा हा वारसा युवानेतृत्व विवेक कोल्हे यांनी समर्थपणे पुढे चालवावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.            

विवेक कोल्हे यांनी मंत्रालय मुंबई येथे भेट घेवून माहिती दिली त्याप्रसंगी फडणवीस यांनी कोल्हे यांचा सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते.          

 देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी सात दशके समाजकारण करत त्यामाध्यमातुन अनेक लोकाभिमुख कामे केली. बिपीन कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विवेक कोल्हे यांना समाजकारणाची संधी प्राप्त झाली असुन त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवुन देशात सहकाराच्या माध्यमांतुन शेतक-यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करून सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडवून कोपरगांवचे नांव आणखी मोठे करावे असेही ते म्हणाले.   

Leave a Reply

You cannot copy content of this page