१३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास प्रत्यक्षात प्रारंभ
131 crore water scheme actually started
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 20July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : ना.आशुतोष काळे यांच्यासाठी ५ नंबर साठवण तलाव ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या ५ नंबर साठवण तलावाच्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे.
५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी निधी मंजूर करून अशक्यप्राय असलेले काम करून दाखविले. यामध्ये नवीन ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीबरोबरच, ९५ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. प्राथमिक चाचणीचे काम प्रत्यक्षात बुधवार (दि.२०) पासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिक सुखावले आहेत. यावेळी धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, जावेद शेख, संदीप कपीले, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, हारुन शेख, सचिन गवारे, रहेमान कुरेशी, जलील अत्तार, मनोज शिंदे, राजु उशिरे, संजय दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, विकास बेंद्रे, शंकरराव घोडेराव, शाहरुख शेख, मोबिन शेख, फकिर चंदनशिव, राजू बागवान, ईश्वर शिंदे, मुक्तार शहा, संतोष मरसाळे, सचिन फुलवट, निसा कुरेशी, रज्जाक कुरेशी, निहाल शेख, आतिफ शेख, रशीद कुरेशी, फिरोज शहा, वाळीबा भाबड, राजु कांबळे, अक्ताफ अत्तार, सोहेल शेख, अमन बागवान, रजीम कुरेशी, नदीम कुरेशी, मुतजीर कुरेशी, समीर कुरेशी, अकबर कुरेशी, जुनेद शेख, अभिषेक मगर, भिवसेन पवार, एकनाथ कुदळे, केदारनाथ बजाज, मारुती साळवे, संजय भावसार, किशोर बागुल, महेश पवार, लक्ष्मण भाटे, राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते.
चौकट :- पाच नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक कामास सुरुवात करून नामदार आशुतोष काळे यांनी येणाऱ्या रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. – सौ.प्रतिभा शिलेदार (शहराध्यक्ष–राष्ट्रवादी महिला काँग्रेस)