कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजून डुकरीकडून जीवदान

कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजून डुकरीकडून जीवदान

Life from the pig by feeding the puppies

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 19July, 18.50
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : मुळातच काही प्राण्यांचे एकमेकांशी वैर असते, मात्र एका डुकरीने मेलेल्या कुत्रीच्या पिलांना आपले दूध पाजून त्यांना लळा लावला आहे, जणू काही आपणच त्या पिल्लांची आई आहोत हे तसूभरही समजून न देता तिने आपले कर्तव्य निभावत हे अनोखे प्रेम पाहून अनेक जण अचंबित झाले आहेत.

कुत्रीच्या पिलांसाठी डुकरीनीने आपले मातृत्व त्यांच्यासाठी बहाल केले आहे, हा अनोखा संगम कोपरगावात पाहायला मिळाला… शहरातील एका पेट्रोलपंपा समोर राजस्थान स्वीट नजिक हा अनोखा प्रकार पाहायला मिळाला आहे.           

काही दिवसांपूर्वी एका कुत्रीला चार-पाच पिल्ले झाली मात्र ही कुत्री अचानक दगावली तिची पिल्ले त्यामुळे अनाथ झाली, त्यामुळे जणू एका डुकरीनीला देवानेच त्यांच्यासाठी आई बनून पाठवले त्या डुकरीने आता त्या पिल्लांना आपले दूध पाजण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे आता या कुत्र्यांना त्या डुकरीनीचा लळाच लागला आहे.           

एरवी  कुत्र्याचे व डुकरीनीचे सहसा सूत्र जमत नाही. हे चित्र श्रीराम मेडिकलचे संचालक हेमंत चव्हाण यांनी आपल्या भ्रमणध्वनी मध्ये टिपल आहे. हे दृश्य मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सर्वसामान्य माणसाला धडा घेण्यासारखेच आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page